Corona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:16 AM2021-05-18T07:16:12+5:302021-05-18T07:16:41+5:30

केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसींचे २० कोटी ७६ लाख १० हजार २३० डोस नि:शुल्क पुरविण्यात आले आहेत.

Corona Vaccine: States still have two crore doses in balance; How much is Maharashtra? | Corona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती? वाचा

Corona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती? वाचा

Next

नवी दिल्ली : देशभरात आता केवळ  २ कोटी ४ लाख ९६ हजार ५२५ डोस राज्य, केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत, तर येत्या तीन दिवसांत २ लाख ९४ हजार ६६० डोस राज्यांना दिले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसींचे २० कोटी ७६ लाख १० हजार २३० डोस नि:शुल्क पुरविण्यात आले आहेत. यापैकी १८ कोटी ७१ लाख १३ हजार ७०५ डोसचा वापर केला. उत्तर प्रदेशात २२ लाख ७० हजार २१६ डोस शिल्लक आहेत. यापाठोपाठ तमिळनाडूत १४ लाख १९ हजार २९६, मध्य प्रदेश १३ लाख ७३ हजार ७८३, गुजरात ११ लाख २५ हजार ५४७, आंध्र प्रदेश ११ लाख २१ हजार ३६९, छत्तीसगढ ९ लाख ९६ हजार ९८६, प. बंगाल ९ लाख १७ हजार ०४४, झारखंड ८ लाख ८९ हजार २१२, ओडिशा ७ लाख ९२ हजार ५६१, तसेच कर्नाटकमध्ये ७ लाख ६ हजार ७३१ डोस शिल्लक आहेत.

डोसचे वाटप आणि वापर
राज्य    डोसचे वाटप     डोसचा वापर
महाराष्ट्र    २,०१,५४,९३०    १,९७,३३,३१४
उ. प्रदेश    १,७४,५०,०१०    १,५१,७९,७९४
गुजरात    १,६२,०४,७३०    १,५०,७९,१८३
राजस्थान    १,६०,८९,८२०    १,५९,५०,३७२
प. बंगाल    १,३४,८३,६४०    १,२५,६६,५९६
कर्नाटक    १,१८,९७,४४०    १,११,९१,७०९
म. प्रदेश    १,०७,५१,०१०    ९३,७७,२२७
बिहार    ९८,०३,२७०    ९३,४८,७७२
केरळ    ८८,६९,४४०    ८४,१५,४५७ 
तमिळनाडू    ८६,५५,०१०    ७२,३५,७१४ 

कोरोना विषाणूचा हवेतून होतो संसर्ग
विषाणूचा हवेतून संसर्ग होतो, असे कित्येक संशोधकांनी व्यक्त केलेल्या मतला आता जागतिक आरोग्य संघटना व अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनेही मान्यता दिली आहे. १४ देशांतील ३९ शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाआधारे जर्नल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, इमारतीतील वायुवीजनाची व्यवस्था तसेच पाण्याच्या फिल्टरेशनची यंत्रणा अधिक उत्तम असल्यास विषाणू संसर्गाचे धोके कमी होतात. 

Web Title: Corona Vaccine: States still have two crore doses in balance; How much is Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.