Corona Vaccine: शुभवर्तमान! लस घेतल्यास लहान मुलांना फायदा की तोटा? रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:02 AM2021-10-07T08:02:34+5:302021-10-07T08:03:13+5:30

लस जिथे टोचण्यात आली तेथील भाग लाल होणे अथवा त्यास सूज येणे, असे प्रकार निदर्शनास आले

Corona Vaccine: Advantages or disadvantages of zycov d vaccinating children? | Corona Vaccine: शुभवर्तमान! लस घेतल्यास लहान मुलांना फायदा की तोटा? रिपोर्टमधून खुलासा

Corona Vaccine: शुभवर्तमान! लस घेतल्यास लहान मुलांना फायदा की तोटा? रिपोर्टमधून खुलासा

Next

एकीकडे आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांना सुरुवात झाली असताना लहान मुलांवरील लसीच्या बाबतीतही शुभवर्तमान आहे. झायकोव्ह-डी या कोरोनाप्रतिबंधक लसीच्या चाचण्या सध्या लहान मुलांवर सुरू असून त्यात लहान मुलांवर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

लसीचे तीन डोस

झायकोव्ह-डी लसीचे तीन डोस देण्यात येतात.

चाचण्यांचे निष्कर्ष काय?
लस जिथे टोचण्यात आली तेथील भाग लाल होणे अथवा त्यास सूज येणे, असे प्रकार निदर्शनास आले. काही जणांना तापही आला. झायकोव्ह-डी लस घेतल्यानंतर मात्र मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. लस घेतल्यानंतर थंडी वाजणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात परंतु झायकोव्ह-डी लस टोचल्यानंतर मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. लस टोचल्यानंतर होणाऱ्या वेदना वगळता मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाही.

झायकोव्ह-डीविषयी
झायकोव्ह-डी ही कोरोनाप्रतिबंधक लस झायडस कॅडिला या कंपनीतर्फे तयार करण्यात आली आहे. १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठीही लस असून तिच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. 

चाचण्या किती जणांवर?
झायकोव्ह-डी लसीच्या चाचण्या देशभरात ५० ठिकाणी १६०० मुलांवर करण्यात येत आहेत. या १६०० मुलांमध्ये सर्व स्तरातील मुलांचा समावेश आहे. वार्षिक २ लाख ते ७० लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील मुलांवर झायकोव्ह-डीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. 

Web Title: Corona Vaccine: Advantages or disadvantages of zycov d vaccinating children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.