Corona Vaccination : कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; पंतप्रधानांना अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:11 AM2021-06-12T07:11:37+5:302021-06-12T07:12:07+5:30

Corona Vaccination: अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला.

Corona Vaccination: Do not vaccinate those who have recovered from corona, according to medical experts; Present the report to the Prime Minister | Corona Vaccination : कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; पंतप्रधानांना अहवाल सादर

Corona Vaccination : कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; पंतप्रधानांना अहवाल सादर

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनाची बाधा झालेल्या व त्यातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही, असे सार्वजनिक आरोग्य या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पंतप्रधानांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 
अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला. टास्क फोर्समधील सदस्य, एम्सचे डॉक्टर, इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इं. असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन, असो. ऑफ पिडेमिऑलॉजिस्टसच्या तज्ज्ञांनी अहवाल बनविला आहे.

तरुणांना लस देणे किमतीच्या दृष्टीने न परवडणारे
डॉक्टरांनी म्हटले आहे की, लसींचा तुटवडा पाहता वयोवृद्ध, स्थूलपणा वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुणांना लस देणे किमतीच्या दृष्टीने परवडणारे नाही. डेल्टा प्रकाराचा संसर्ग असलेल्या भागात कोविशिल्डच्या २ डोसचे १२ आठवड्यांचे अंतर घटवण्याचा विचार करावा.

आवश्यकता असलेल्यांनाच लस द्या
-
लहान मुलांसह सर्वांना लस देण्याऐवजी ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्यांनाच ही लस देण्यात यावी. 
- पोलिओ किंवा इतर लसी देण्याच्या मोहिमांमधील अनुभव कोरोना लसीकरण मोहीम राबविताना उपयोगी ठरतील, असेही डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

Web Title: Corona Vaccination: Do not vaccinate those who have recovered from corona, according to medical experts; Present the report to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.