Corona Vaccination: ३२ कोटी लोकांना एकही डोस नाही- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:54 AM2021-10-22T06:54:44+5:302021-10-22T06:55:38+5:30

लसीकरण गतीत अन्य देशांच्या तुलनेत खूपच मागे

Corona Vaccination 32 crore people did not get single dose says congress | Corona Vaccination: ३२ कोटी लोकांना एकही डोस नाही- काँग्रेस

Corona Vaccination: ३२ कोटी लोकांना एकही डोस नाही- काँग्रेस

googlenewsNext

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली :  लसीकरणाच्या गतीत भारताने मोठे यश मिळविले आहे का? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस अन्य देशांच्या लसीकरणाच्या गतीच्या तुलनेत भारत खूपच मागे असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसने आज जी-२० देशांची यादी जारी करुन केंद्र सरकारला सवाल केला की, भारत या यादीत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर का आहे? हे आमचे मोठे यश आहे का? कोरोनाच्या साथीच्या काळात सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे मृत्यू पावलेल्यांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करून काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांंनी म्हटले की, देशाची एकूण लोकसंख्या १३९ कोटी आहे. यापैकी १०३ कोटी प्रौढ आहेत.  फक्त २९ कोटी लोकांना लसीचे दोन  डोस मिळाले आहेत. ४२ कोटी लोकांना एकच डोस मिळाला आहे. यावरून स्पष्ट होते की,  ३२ कोटी लोकांना अद्याप लसच देण्यात आलेली नाही. जागतिक आकडेवारीनुसार  २० देशांच्या यादीत भारत लसीकरणात १९ व्या क्रमांकावर आहे. भारताची लसीकरणाची गती  गती खूप धिमी आहे.

अन्य लसींना परवानगी का नाही?
सरकारने जगातील अन्य लसीला का परवानगी दिली नाही? बालकांसाठीच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसचे काय झाले? १०० कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट्य साध्य केल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची निभावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली पाहिजे, केंद्र सरकारची नाही. हे सरकार दुसऱ्याच्या मेहनतीचे श्रेय स्वत:कडे ओढून घेत आहे.

Web Title: Corona Vaccination 32 crore people did not get single dose says congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.