CoronaVirus: आता भारतात अँटीबॉडी कॉकटेलनं होणार कोरोना रुग्णांवर उपचार, आपत्कालीन वापराला मिळाली मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 09:54 PM2021-05-05T21:54:48+5:302021-05-05T21:59:50+5:30

अँटीबॉडी कॉकटेलचा वापर कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारात केला जातो. 

Corona treatment medicine roche antibody cocktail gets regulatory approval in india | CoronaVirus: आता भारतात अँटीबॉडी कॉकटेलनं होणार कोरोना रुग्णांवर उपचार, आपत्कालीन वापराला मिळाली मंजुरी 

CoronaVirus: आता भारतात अँटीबॉडी कॉकटेलनं होणार कोरोना रुग्णांवर उपचार, आपत्कालीन वापराला मिळाली मंजुरी 

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारताला आणखी एक शस्त्र मिळाले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रॉशे या औषध निर्माता कंपनीच्या अँटीबॉडी कॉकटेलला भारत सरकारने वापरासाठी आपात्कालीन मंजूरी दिली आहे. यासंदर्भात, रोशे इंडियाने बुधवारी घोषणा केली, की सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) भारतात कोरोना रुग्णांच्या उपचारात अँटीबॉडी कॉकटेलला आपात्कालीन मंजूरी दिली आहे.

रोशे फार्मा इंडियाचे एमडी व्ही सिम्पसन इमॅन्युएल यांनी म्हटले आहे, की ''भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रोशे विश्वास दर्शवतो, की रुग्णांच्या हॉस्पिटलायझेशन आणि हेल्थकेअर सिस्टिमवरील ताण कमी करण्यासाठी आम्ही शक्यते सर्व प्रयत्न करू. अँटीबॉडी कॉकटेल सारख्या casirivimab आणि imdevimab कोरोनाविरोधातील लढ्यात आणि अधिक जोखीम असलेल्या रुग्णांची स्थिती बिघडण्यापूर्वी उपचारात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. कोविड -19 चा ओपीडी इलाज लसीकरण अभियानास पूरक असेल आणि भारतात महामारीविरोधातील आपल्या लढाईचे समर्थन करेल.''

CoronaVirus: व्वा...! भाजप आमदाराची धाव; 3 मजली घराला कोवीड रुग्णालय बनविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

रॉश इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे, की भारतात casirivimab आणि imdevimab अँटीबॉडीच्या मिश्रणाचा वापर करायची परवानगी अमेरिकेत ईयूएसाठी जमा आकडे आणि सीएचएमपीच्या वैज्ञानिकांच्या सल्ल्याच्या आधारे मिळाली आहे.

कंपनीने म्हटले आहे, की ''आपत्कालीन वापराची परवानगी मिळाल्यानंतर, रॉश जगातील उत्पादकांकडून याची आयात करून भारतातील सहकारी सिप्लाच्या माध्यमाने वितरित करू शकते.'' अँटीबॉडी कॉकटेलचा वापर कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारात केला जातो. 

CoronaVirus : खरच, हवा आणि प्राण्यांपासून कोरोना पसरतो...? सरकारनं दिलं उत्तर

Web Title: Corona treatment medicine roche antibody cocktail gets regulatory approval in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.