बांधकाम क्षेत्राने वाढवले ग्रामीण भागांत राेजगार; शहरांमध्ये तुलनेने राेजगार निर्मिती कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 03:57 AM2021-02-09T03:57:43+5:302021-02-09T07:32:15+5:30

अर्थव्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीत १.२ काेटी जणांना राेजगार मिळाला.

The construction sector has increased employment in rural areas | बांधकाम क्षेत्राने वाढवले ग्रामीण भागांत राेजगार; शहरांमध्ये तुलनेने राेजगार निर्मिती कमी

बांधकाम क्षेत्राने वाढवले ग्रामीण भागांत राेजगार; शहरांमध्ये तुलनेने राेजगार निर्मिती कमी

Next

नवी दिल्ली : काेराेना महामारीचा राेजगार निर्मितीला फटका बसला होता. मात्र, राेजगार निर्मितीत सुधारणा हाेत असून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील कामगारांच्या हाताला काम मिळू लागले आहे. ग्रामीण भागात वाढलेल्या बांधकाम क्षेत्रातील कामांमुळे हे शक्य झाले आहे. 

अर्थव्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीत १.२ काेटी जणांना राेजगार मिळाला. त्यापैकी ८२ लाख जणांना ग्रामीण भागात बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रात राेजगार मिळालेला आहे. त्या तुलनेत या क्षेत्राने शहरी भागात केवळ ३.५ लाख राेजगार निर्मिती केली आहे. कृषी क्षेत्राने ४२.६ लाख जणांना राेजगार दिला आहे. त्या तुलनेत उत्पादन व खनिकर्म क्षेत्रात वाढ कमी दिसून आली. डिसेंबरच्या तुलनेत सेवा क्षेत्रातील राेजगार निर्मितीत सुमारे ३० लाखांनी घट झाली आहे. शहरी भागातही सेवा क्षेत्रात अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही.

शहरांतून परतलेल्यांचा मोर्चाही शेती क्षेत्राकडे 
काेराेना महामारीचा ग्रामीण भागातील राेजगारावर शहरांच्या तुलनेत कमी परिणाम झाला आहे. 
तसेच शहरांमधून गावी गेलेल्या लाेकांनीही शेतीकडे माेर्चा वळवला. यासाेबतच रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रानेही त्यांना सामावून घेतले. 
तर, संघटित आणि सेवा क्षेत्रात कमी सुधारणा हाेत असल्याने या क्षेत्रात कमी लाेकांना राेजगार मिळत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Web Title: The construction sector has increased employment in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.