"मी यापुढे RSS चा 'संघ परिवार' असा उल्लेख करणार नाही"; राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:44 AM2021-03-25T11:44:17+5:302021-03-25T11:49:44+5:30

Congress Rahul Gandhi And RSS : राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला आहे.

congress rahul gandhi Slams rss sangh parivaar bjp | "मी यापुढे RSS चा 'संघ परिवार' असा उल्लेख करणार नाही"; राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण

"मी यापुढे RSS चा 'संघ परिवार' असा उल्लेख करणार नाही"; राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सातत्याने विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर (BJP) सातत्याने हल्लाबोल करत आहेत. याच दरम्यान आता राहुल यांनी आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला आहे. यापुढे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "संघ परिवार" म्हणणार नाही असं म्हणत त्यांनी आरएसएसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान दिला जात नसल्याचं देखील यावेळी राहुल यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत एक ट्विट केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "संघ परिवार" का म्हणणार नाही यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. "माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांना संघ परिवार असं म्हणणं योग्य ठरणार नाही. परिवार (कुटुंब) म्हटल्यावर तिथे महिलांचा आणि वयस्कर व्यक्तींचा आदर केला जातो. या व्यक्तींबद्दल आदर आणि प्रेमाची भावना असते. असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घडत नाही. त्यामुळे मी यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघ परिवार म्हणणार नाही" असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"नागपुरात जन्मलेली एक ताकद संपूर्ण देशाला नियंत्रित करू पाहतेय"; राहुल गांधीचा RSS ला सणसणीत टोला

आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Assam Assembly Elections 2021) सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. राजकारण तापलं आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. ते विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत असून दिब्रुगढमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आरएसएसला सणसणीत टोला लगावला आहे. 

राहुल गांधी "देशात लोकशाहीचं पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही. नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 27 मार्च रोजी आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्यासाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. 

Web Title: congress rahul gandhi Slams rss sangh parivaar bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.