"वो जुमलों का शोर मचाते हैं, हम..."; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:11 PM2021-02-19T15:11:02+5:302021-02-19T15:16:38+5:30

Congress Rahul Gandhi And Modi Government : इंधन दरवाढ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे.

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Fuel Price Hike | "वो जुमलों का शोर मचाते हैं, हम..."; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

"वो जुमलों का शोर मचाते हैं, हम..."; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

Next

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंधन दरवाढ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना व्हायरस, भारत-चीन संघर्ष यावरून जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर राहुल यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. इंधन दरवाढीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून जोरदार टीका केली आहे. "वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं।" असं म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. तसेच "जून 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती 93 डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल 71 तर डिझेल 57 रुपये प्रतिलिटर होतं. गेल्या 7 वर्षांत कच्चं तेल 30 डॉलरने स्वस्त झालं. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करत आहे आणि डिझेल त्याच्या पाठोपाठ जात आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"2021 मध्ये 19 वेळा ही दरवाढ झाली आहे. म्हणजेच 45 दिवसांत 19 वेळा किंमत वाढली आहे. 15 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या काळात पेट्रोल 17.05 तर डिझेल 14.58 रुपयांनी महाग झालं आहे" हे सांगणारी आकडेवारी राहुल गांधी यांनी सादर केली आहे. याच दरम्यान पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर भाजपाच्या एका मंत्र्याने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री असणाऱ्या विश्वास सारंग यांनी वाढत्या इंधनदरांमुळे नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. तसेच यामागचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांनी सौरऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचे आभार मानायला हवेत असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. 

पेट्रोलने शंभरी पार करताच भाजपा मंत्र्याने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाले...

वाढत्या इंधनदरावरील कर कमी करून नागरिकांना ते उपलब्ध करता येऊ शकते का? असा सवाल विश्वास सारंग यांना करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. "मला पंतप्रधानांचे अभिनंदन करायचे आहे. वाहतुकीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबत तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी व्यवस्था तयार केली आहे. मोदींच्या इलेक्ट्रॉनिक वाहने आणण्याच्या निर्णयामुळे तेलाच्या किंमतीवरील आपले नियंत्रण अधिक मजबूत होईल. आंतराष्ट्रीय बाजारात मागणी आणि पुरवठ्यामुळे तेलाचे दर कमी होतात. अशा परिस्थितीत जर आपण मागणी कमी केली तर तेलाच्या किंमतींवर आपले नियंत्रण असेल म्हणूनच मोदींनी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेलाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यात आपण सक्षम बनू" असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. 


 

Web Title: Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Fuel Price Hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.