दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:11 AM2021-10-17T11:11:05+5:302021-10-17T11:13:16+5:30

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते.

Congress MP Manish Tewari says larger pan Islamist agenda at work in South Asia  | दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी रविवारी एक ट्विट केले आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामीक अजेंडा काम करत असल्याचे म्हणत, त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जम्मू-काश्मिरात मुस्लिमेतरांच्या हत्या, काश्मीरमध्ये सैनिकांचे बलिदान आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, या सर्व घटनांचा संबंध एकमेकांशी जोडत, त्यांनी हे ट्विट केले आहे. (A larger pan Islamist agenda at work in South Asia - Manish Tewari)

तिवारी म्हणाले, काश्मीरमध्ये बिगर मुस्लिमांची हत्या, बांगलादेशात हिंदूंची हत्या आणि पुंछमध्ये 9 जवानांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का? कदाचित असे आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामिक अजेंडा काम करत आहे.

कश्मिरात आठवड्याभरात 9 जवानांना हौतात्म्य -
जम्मू-काश्मिरात अँटी-टेरर ऑपरेशनमध्ये (Anti Terror Operation) 9 जवान शहीद झाले आहेत. गेल्या सोमवारपासून आतापर्यंत दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 9 जवानांना हौतात्म्य आले आहे. गेल्या आठवड्यात पुंछमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या एका चकमकीत 5 जवानांना हौतात्म्य आले. यानंतर, 14 ऑक्टोबरला आणखी एका चकमकीत दोन जवानांना हौतात्म्य आले होते.

काश्मिरात मुस्लिमेतरांवरांवर हल्ले -
कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते. या दहशतवाद्यांनी केवळ 5 दिवसांतच 7 सामान्य नागरिकांची हत्या केली. तेव्हापासूनच सुरक्षादलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधत ऑपरेशन सुरू केले आहे. 

बांगलादेशातही धार्मिक हिंसाचार -
बांगलादेशातही  हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांना निशाना बनवण्यात येत आहे. एका अफवेनंतर तेथे सर्वप्रथम एका दुर्गापुजा पेंडॉलवर हल्ला करण्यात आला आणि हिंदू देवतेच्या मूर्ती तोडण्यात आल्या. तेथे अनेक जिल्ह्यांत तणावाची परिस्थिती आहे. तेथील नवाखली येथे शुक्रवारी नमाननंतर जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला होता. यावेळी श्रद्धाळूंना मारहाणही करण्यात आली. या हल्ल्यात एकाचा मृत्यूही झाला होता. आतापर्यंत, येथील धार्मिक हिंसाचारात मरणारांची संख्या 6 वर पोहोचली आहे. 200 हून अधिक हिंदू श्रद्धाळू जख्मी झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -
बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू

Web Title: Congress MP Manish Tewari says larger pan Islamist agenda at work in South Asia 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.