केजरीवालांच्या विरोधात लढणार शीला दीक्षितांची मुलगी लतिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 01:46 PM2020-01-16T13:46:20+5:302020-01-16T13:59:54+5:30

शीली दीक्षत यांच्याबद्दल सहानुभूती असणाऱ्या मतदारांची लतिता दीक्षित यांनी मतं मिळू शकतात.

Congress May Field Sheila Dikshit's Daughter Against Kejriwal From New Delhi Assembly Seat | केजरीवालांच्या विरोधात लढणार शीला दीक्षितांची मुलगी लतिका?

केजरीवालांच्या विरोधात लढणार शीला दीक्षितांची मुलगी लतिका?

googlenewsNext

नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच, पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मात देण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसकडून तगडा उमेदवार उभे करण्याचे प्रयत्न सुरु आहे. 

काँग्रेस अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेत्या शीला दीक्षित यांची मुलगी लतिका दीक्षित यांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. मीडियाच्या सुत्रांनुसार, काँग्रेस लतिका दीक्षित यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या या जागेवर राजेश लिलोठिका यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असेही समजते की, काँग्रेस या जागेवर अलका लांबा यांनी उमेदवारी देऊ शकते. 

काँग्रेसच्या एका ग्रुपला वाटते की, या जागेवर लतिका दीक्षित यांनी निवडणूक लढवावी. कारण, शीली दीक्षत यांच्याबद्दल सहानुभूती असणाऱ्या मतदारांची लतिता दीक्षित यांनी मतं मिळू शकतात. मात्र, सध्या काँग्रेस यावर विचारमंथन करत आहे. दरम्यान, या जागेवरून आम आदमी पार्टीकडून दोनवेळा काँग्रेसचा पराभव झाला आहे. 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2015 मध्ये काँग्रेसचे माजी मंत्री किरण वालिया यांच्या सुद्धा पराभव झाला होता.

दरम्यान, आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्याअसलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 

2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता. 

महत्त्वाच्या बातम्या 

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

36 केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार, सरकारच्या योजनांची माहिती देणार

'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला

दिल्लीत उघडली सिंचन घोटाळ्याची फाईल!; अजित पवार अडचणीत येणार?

काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरूच; धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द

Web Title: Congress May Field Sheila Dikshit's Daughter Against Kejriwal From New Delhi Assembly Seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.