राहुल गांधी म्हणाले, "कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग, संपूर्ण लॉकडाऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:30 AM2021-05-04T11:30:04+5:302021-05-04T11:31:17+5:30

Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

congress leader rahul gandhi slams central government on coronavirus said full lockdown is must | राहुल गांधी म्हणाले, "कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग, संपूर्ण लॉकडाऊन..."

राहुल गांधी म्हणाले, "कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग, संपूर्ण लॉकडाऊन..."

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्यासध्या देशात ३४,४७,१३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडताना दिसत आहे. गेल्यावर्षी सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी टीका केली होती. परंतु आता कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच हे बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. 

"भारत सरकारला समजत नाहीये. या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमात्र मार्ग आहे आणि तो म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन. भारत सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जात आहे," असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. 



गेल्या चोवीस तासांत देशात ३, ५७,२२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ३,२०,२८९ जणांनी कोरोनावर मात केली. देशात गेल्या चोवीस तासांत ३,४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात ३४,४७,१३३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली. तसंच आतापर्यंत देशात १५,८९,३२,९२१ नागरिकांचं लसीकरण झालं असल्याचंही सांगण्यात आलं. 

कोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का?

हो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3791 votes)
नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2408 votes)

Total Votes: 6199

Web Title: congress leader rahul gandhi slams central government on coronavirus said full lockdown is must

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.