PM मोदी अन् त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किमी जमीन चीनला सोपवली; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 05:22 PM2021-08-02T17:22:53+5:302021-08-02T17:23:15+5:30

भारत आणि चीन यांच्यात 31 जुलैला लष्करी चर्चेची 12 वी फेरी झाली. या बैठकीत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या विविध भागांतून सैन्य तत्काळ मागे घेण्यावर भर देण्यात आला.

Congress leader Rahul gandhi attacks on PM Narendra Modi over india china border issue | PM मोदी अन् त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किमी जमीन चीनला सोपवली; राहुल गांधींचा निशाणा

PM मोदी अन् त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किमी जमीन चीनला सोपवली; राहुल गांधींचा निशाणा

googlenewsNext

नवी दिल्ली - भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी ट्विट करत आरोप केला आहे, की पंतप्रधान मोदी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किलोमीटर जमीन चीनला दिली आहे. आम्ही ती परत कधी मिळवत आहोत? (Congress leader Rahul gandhi attacks on PM Narendra Modi over india china border issue)

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की "मोदीजी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारतीची हजारो किलोमीटर जमीन चीनला दिली. आम्ही ते परत कधी मिळवत आहोत?" राहुल गांधी यांनी या मुद्यावरून सरकारला घेरण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा याच मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे.

भारत आणि चीन यांच्यात 31 जुलैला लष्करी चर्चेची 12 वी फेरी झाली. या बैठकीत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या विविध भागांतून सैन्य तत्काळ मागे घेण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांतील ही चर्चा जवळपास नऊ तास चालली. अशातच राहुल गांधी यांचे हे ताजे ट्विट आले आहे.

भारत-चीन यांच्यात झालेल्या लष्करी चर्चेच्या 12 व्या फेरीच्या सुमारे दोन आठवडे आधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना स्पष्टपणे सांगितले होते की, पूर्व लडाखमधील सततच्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर नकारात्मक परिणाम होत आहे. ताझाकिस्तानची राजधानी दुशांबे येथे 14 जुलै रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी -
जगातील सर्वात शक्तीशाली 15 सदस्य असलेली संस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी मिळाली आहे. फ्रान्सकडून भारताला पुढील कार्यभार सोपविण्यात आला आहे. भारतासोबत समुद्री सुरक्षा, दहशतवाद तसेच अन्य मुद्द्यांवर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे फ्रान्सचे राजदूत इमैनुएल लेनैन यांनी म्हटले आहे. भारताला हे अध्यक्षपद मिळालेल्याने चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे.

Web Title: Congress leader Rahul gandhi attacks on PM Narendra Modi over india china border issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.