पराभवाच्या समीक्षेसाठी  काँग्रेसची समिती, अशोक चव्हाणांकडे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:06 AM2021-05-12T06:06:06+5:302021-05-12T06:10:10+5:30

सोनिया गांधींनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

Congress committee headed by Ashok Chavan to review the defeat | पराभवाच्या समीक्षेसाठी  काँग्रेसची समिती, अशोक चव्हाणांकडे नेतृत्व

पराभवाच्या समीक्षेसाठी  काँग्रेसची समिती, अशोक चव्हाणांकडे नेतृत्व

Next

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यामागील कारणे शोधण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे समितीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. समितीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, मनिष तिवारी, विन्सेंट पाला आणि ज्योत‍ी मणी यांचा समावेश आहे. 

सोनिया गांधींनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
 
Web Title: Congress committee headed by Ashok Chavan to review the defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.