शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आणि दुष्काळ हातात हात घालून चालतात, मोदींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 17:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहिल्या इको फ्रेंडली रिफायनरीचं उद्घाटन केलं आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहिल्या इको फ्रेंडली तेल रिफायनरीचं उद्घाटन केलं आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि दुष्काळ हातात हात घालून चालतात, अशी बोचरी टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे. ते राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातील रिफायनरीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.ते म्हणाले, काँग्रेस प्रकल्पांच्या उद्घाटनाशिवाय काही करत नाही आणि फक्त मोठं मोठं बोलते. रेल्वे बजेटमध्ये काँग्रेसनं 1500हून अधिक घोषणा दिल्यात, त्या सगळ्या हवेतच विरल्या आहेत. वन रँक वन पेन्शनमध्ये काँग्रेसनं जवानांसोबत छळ केला होता. तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनंही बजेटमध्ये फक्त दिखावा केला होता. 2022ला ज्या वेळी लोक 75 वर्षांच्या स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन करत असतील, त्यावेळीच ही रिफायनरी कार्यान्वित होईल. मोदींनी यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही स्तुतिसुमने उधळली आहेत. राजस्थान सरकार 40 हजार कोटी रुपये वाचवण्यात यशस्वी झालं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात असलेल्या पंचपदरा येथे ही तेल रिफायनरी बनवली जात आहे. राजस्थानमधील नागरिकांना हा प्रकल्प सुरू कधी होतो याची उत्कंठा लागून राहिली आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम राजस्थानात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. राजस्थान सरकार आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारणार आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठी गुंतवणूक असलेला प्रकल्प ठरणार आहे. राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातील रिफायनरीवर जवळपास 43 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चार वर्षांमध्ये ही रिफायनरी तयार होणार असून, बीएस-6 या तंत्रज्ञानावर ती आधारित आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस