रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरने घरबसल्या VCवरून दिल्या सूचना, कंपाऊंडरने केलं डायलेसिस अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 11:49 AM2020-07-03T11:49:58+5:302020-07-03T12:07:24+5:30

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

compounder was doing dialysis due to video conferencing patient died in center | रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरने घरबसल्या VCवरून दिल्या सूचना, कंपाऊंडरने केलं डायलेसिस अन्...

रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरने घरबसल्या VCवरून दिल्या सूचना, कंपाऊंडरने केलं डायलेसिस अन्...

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. रुग्णालय आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. डॉक्टरने घरबसल्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सूचना दिल्यावर कंपाऊंडरने डायलेसिस केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे रुग्णाच्या जीवावर बेतलं असून त्याचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रांची जवळच्या जामताडामध्ये ही घटना घडली आहे. डॉक्टर गेले तीन महिने रुग्णालयातच आला नसल्याची माहिती समोर आली आहे. तो घरीच बसून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कंपाऊंडरला सूचना देत होता. यामध्ये रतन साधू या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डायलेसिस करताना इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. इंजेक्शन देतानाच रुग्ण बेशुद्ध झाला आणि नंतर त्याचा मत्यू झाल्याचं कंपाऊंडरने म्हटलं आहे.

धक्कादायक घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 6,25,544 वर गेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

"नातीने आजीचं नाक कापलं"; परेश रावल यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Web Title: compounder was doing dialysis due to video conferencing patient died in center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.