अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टविरुद्ध तक्रारअर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 05:05 AM2019-10-17T05:05:13+5:302019-10-17T05:05:37+5:30

एखाद्या वस्तूची डिलिव्हरी करताना ती पॅकिंगच्या नावाखाली प्लास्टिक काही थरांमध्ये गुंडाळलेले असते.

Complaint filed against Amazon, Flipkart | अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टविरुद्ध तक्रारअर्ज दाखल

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टविरुद्ध तक्रारअर्ज दाखल

Next

बंगळुरू : उत्पादनांची ग्राहकांना डिलिव्हरी करताना अ‍ॅमेझॉनफ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्या पॅकिंगसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त प्लास्टिकचा वापर करत असल्याची तक्रारआदित्य दुबे अकरावीमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने केली आहे. याप्रकरणी त्याने या दोन कंपन्यांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाद मागितली आहे.


आदित्यने अर्जात म्हटले आहे की, एखाद्या वस्तूची डिलिव्हरी करताना ती पॅकिंगच्या नावाखाली प्लास्टिक काही थरांमध्ये गुंडाळलेले असते. इतक्या आवरणांची खरे तर आवश्यकता नसते. त्यामुळे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांनी प्लास्टिकचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आदेश त्यांना राष्ट्रीय हरित लवादाने द्यावेत.
त्याने सांगितले की, अनब्रेकेबल वस्तूही दोन-दोन कार्डबोर्ड बॉक्समध्ये घालून ग्राहकांना पाठविण्यात येतात. या बॉक्सवर प्लास्टिकचे तीन थरांचे आवरण असते. इनव्हॉईस व अन्य गोष्टींसाठी वेगळे प्लास्टिक आवरण असते. त्यांची गरज नसते.


प्लास्टिकचा वापर करू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टकडून होणाºया प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणविषयक संकट उभे राहाण्याची शक्यता आहे असेही आदित्यने म्हटले आहे. त्याच्या अर्जाची सुनावणी राष्ट्रीय हरित लवादापुढे या आठवड्यातच होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

कंपन्यांची दखल नाही
ई-कॉमर्स कंपन्या भारतात किती प्लास्टिक कचरा निर्माण करतात याबद्दलची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. प्लास्टिकचा अतिरिक्त वापर करणे टाळा असे टिष्ट्वट आदित्य दुबे याने अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट कंपन्यांना केले होते. पण त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. १६ वर्षे वयाच्या मुलाची कोण कशाला दखल घेईल असा सवाल त्यावर आदित्यने विचारला.

Web Title: Complaint filed against Amazon, Flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.