काँग्रेस पाकिस्तानप्रमाणे देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय, CAB वरून मोदींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 05:16 PM2019-12-15T17:16:34+5:302019-12-15T17:17:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत प्रथमच जाहीरपणे भाष्य केले आहे.

citizen amendment bill : Narendra Modi Attack on Congress | काँग्रेस पाकिस्तानप्रमाणे देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय, CAB वरून मोदींचा हल्लाबोल 

काँग्रेस पाकिस्तानप्रमाणे देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय, CAB वरून मोदींचा हल्लाबोल 

Next

दुमका - केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सध्या देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांकडून या विधेयकाला विरोध होत असतानाच देशातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत प्रथमच जाहीरपणे भाष्य केले आहे. मोदींनी या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि सहकारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कालपर्यंत देशाला बदनाम करण्याचे जे काम पाकिस्तान करायचा ते आता काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असा आरोप मोदींनी केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुमका येथे प्रचारसभा घेतली. त्यावेळी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेस आणि त्यांचे सहकारी वाद निर्माण करत आङेत. त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसल्याने जाळपोळ करत आहेत. मात्र ही जाळपोळ करणारे कोण आहेत, हे त्यांनी घातलेल्या कपड्यांवरून समजून येत आहे, असा टोला मोदींनी लगावला. 



 नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसने परदेशात केलेल्या आंदोलनांवरही मोदींनी टीका केली. कलम 370 , राम जन्मभूमीबाबत पाकिस्तानने लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन केले होते. आता काँग्रेस पाकिस्तानचीच री ओढत आहे, असा आरोप मोदींनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसेन दिल्लीमध्ये भारत बचाओ रॅलीचे आयोजन केले होते. तत्पूर्वी एक दिवस आधी  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जगभरातील भारतीय दूतावासांबाहेर आंदोलन केले होते. 

Web Title: citizen amendment bill : Narendra Modi Attack on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.