Narendra Modi: "आपण एक पाऊल टाका, सरकार चार पाऊल पुढे येईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 01:37 PM2020-06-02T13:37:49+5:302020-06-02T14:50:08+5:30

मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाले आहेत. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. मात्र, त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

In cii annual session 2020 pm modi saied you just take one step the government will take four steps sna | Narendra Modi: "आपण एक पाऊल टाका, सरकार चार पाऊल पुढे येईल"

Narendra Modi: "आपण एक पाऊल टाका, सरकार चार पाऊल पुढे येईल"

Next
ठळक मुद्देआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले.यावेळी मोदींनी, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासंदर्भात सरकारचा काय विचार करत आहे, यावर भाष्य केले.मोदी म्हणाले, मला देशाच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात देशासमोर आर्थिक पातळीवर अनेक आव्हाने आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाला सुरुवात केली आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी, "सरकार आपल्या पाठीशी आहोत. आपण केवळ एक पाऊल पुढे या, सरकार चार पाऊल पुढे येईल," असा विश्वास त्यांनी व्यापाऱ्यांना दिला. 

यावेळी मोदींनी, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासंदर्भात सरकारचा काय विचार करत आहे, यावर भाष्य केले. ते म्हणाले, देशाने आता लॉकडाउन मागे सोडला आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी देशात एकही PPE किट तयार झालेली नव्हती. मात्र, आज दिवसाला तीन लाख किट तयार होत आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर सरकारचे लक्ष असेल. एवढेच नाही, तर भारतीय उद्योग संघाने (CII) प्रत्येक सेक्टरसंदर्भात एक रिसर्च तयार करून तो मला द्यावा, असेही मोदी म्हणाले.

CoronaVirus News: भारतात कोरोना टेकतोय गुडघे; ...तर लवकरच वाढणार ठणठणीत होणाऱ्यांचा आकडा!

व्यापाऱ्यांनी पुढे यावे, मी त्यांच्यासोबत -
पंतप्रधान मोदींनी व्यापाऱ्यांना विश्वास दिला, की ते त्यांच्यासोबत उभे आहेत. आपण एक पाऊल पुढे आलात, तर सरकार चार पाऊल पुढे येईल. आत्मनिर्भर भारताचा अर्थ रोजगार आणि विश्वास निर्माण करणे, असा आहे. जेनेकरून जागतीक सप्लायमध्ये भारताचा वाटा वाढेल. आता देशात, अशा उत्पादनांची आवश्यकता आहे, जे 'मेड इन इंडियासोबतच, मेड फॉर वर्ल्ड' असेल, असेही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाले आहेत. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. मात्र, त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

George Floyd death: अमेरिकेत 52 वर्षांनंतर सर्वात मोठा हिसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू

मला देशाच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे, म्हणूनच विश्वास आहे की, आम्ही पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला वेगवान गती देऊ. कोरोनाने भलेही अर्थव्यवस्थेचा वेग कमी केला असेल परंतु लॉकडाऊन मागे सोडून भारताने अनलॉक 1 च्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असेही ते म्हणाले.

धक्कादायक दावा! चीन नव्हे, युरोपात होता कोरोनाचा पहिला रुग्ण; नोव्हेंबरमध्ये समोर आली होती पहिली केस

Web Title: In cii annual session 2020 pm modi saied you just take one step the government will take four steps sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.