chetan bhagat vs anant hedge on twitter hindu muslim economy | 'हिंदू-मुस्लीम ऐवजी अर्थव्यवस्थेवर लक्ष द्या'; चेतन भगत-अनंत हेगडे ट्विटरवर भिडले

'हिंदू-मुस्लीम ऐवजी अर्थव्यवस्थेवर लक्ष द्या'; चेतन भगत-अनंत हेगडे ट्विटरवर भिडले

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यावरून नवीन वाद निर्माण झाला असून हिंदू-मुस्लीम या मुद्द्यांवरून राजकारण पेटले आहे. 

या वादात लेखक चेतन भगत उडी घेतली आहे. हिंदू-मुस्लीम मुद्द्यांवरून सुरू असलेला वाद काही वेळासाठी सोडून दिला पाहिजे आणि कामावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे ट्विटर चेतन भगत यांनी केले आहे. मात्र, याला माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे चेतन भगत आणि अनंत हेगडे यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाले आहे. 

चेतन भगत ट्विटरवर नेहमीच आपल्या राजकीय विचारांचे ट्विट करताना दिसतात. बुधवारी त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "जर आपण हिंदू-मुस्लीम हा मुद्दा पुढील 20 वर्षांसाठी बाजूला ठेवला आणि अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले. तर आपण 2040 पर्यंत जीडीपीमध्ये 10 हजार डॉलर प्रति कॅपिटाच्या हिशोबाने पोहचू शकतो."

चेतन भगत यांच्या या ट्विटला अनंत हेगडे यांनी उत्तर दिले आहे. अनंत हेगडे म्हणाले, "या मोठ्या प्रस्तावाला पुढे ठेवत आहोत. त्यांनी स्वत: विचार केला पाहिजे की जे फक्त एकाच देवावर विश्वास ठेवतात आणि बाकीच्यांना काफीर मानतात." याशिवाय, अनंत हेगडे यांनी लिहिले की, "आम्ही फक्त विकासाचा अजेंडा पुढे नेत आहोत. मात्र, समोरून येणारे लोक ग्लोबल जिहाद वाढवत आहेत. चेतन भगत मुर्खांच्या दुनियेत जगत आहेत." 

याआधीही अनंत हेगडे यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त ट्विट्स केले आहेत. दुसरीकडे, चेतन भगत सुद्धा ट्विटरवरून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करताना दिसून येतात. तसेच, अर्थव्यवस्थेतील मंदीच्या मुद्यावरूनही चेतन भगत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारचे 40 हजार कोटी वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले असा दावा अनंत हेगडे यांनी केला होता. भाजपाकडे बहुमत नसतानाही फडणवीस मुख्यमंत्री का बनले असा सवाल आत्तापर्यंत उपस्थित करण्यात येत होता. त्यामागे कारण होते असा दावा हेगडेंनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या 

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

36 केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार, सरकारच्या योजनांची माहिती देणार

'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला

दिल्लीत उघडली सिंचन घोटाळ्याची फाईल!; अजित पवार अडचणीत येणार?

काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरूच; धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द

Web Title: chetan bhagat vs anant hedge on twitter hindu muslim economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.