हॅशटॅग ब्लॉक करायला आम्ही फेसबुकला सांगितलं नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 03:58 PM2021-04-29T15:58:33+5:302021-04-29T16:01:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडितून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली.

central govt not asked facebook to block hashtag about resign modi | हॅशटॅग ब्लॉक करायला आम्ही फेसबुकला सांगितलं नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

हॅशटॅग ब्लॉक करायला आम्ही फेसबुकला सांगितलं नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देहॅशटॅगप्रकरणी केंद्राचे स्पष्टीकरण 'वॉल स्ट्रीट जर्नल'कडून देण्यात आलेल्या बातमीवर आक्षेप फेसबुकनेही केला यासंदर्भात खुलासा

नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. देशभरात कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. देशभरात कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यातच फेसबुकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडितून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. मात्र, तो हॅशटॅग हटवण्यासाठी फेसबुकला निर्देश दिले नव्हते, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. (central govt not asked facebook to block hashtag about resign modi)

सोशल मीडियावरुन सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. तसेच, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात येत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर #ResignModi हा हॅशटॅग चालविण्यात येत होता. मात्र, २८ एप्रिल रोजी फेसबुकने हा हॅशटॅग काही काळासाठी ब्लॉक केला. यावर केंद्र सरकारकडून खुलासा करण्यात आला आहे. 

नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल

आरोप संपूर्णपणे भ्रामक

#ResignModi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेन्ड झाल्यानंतर तो ब्लॉक करणे हा सार्वजनिक असंतोषावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न होता, असा आरोप अमेरिकेतील वर्तमानपत्र 'वॉल स्ट्रीट जर्नल'कडून करण्यात आला होता. हा आरोप संपूर्णपणे भ्रामक असल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे. ही बातमी पूर्णपणे बनावट आणि 'निर्मित' असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

लसीकरणाची किंमत समान हवी; मुंबई हायकोर्टाचा सुनावणी करण्यास नकार

'खोट्या' आणि 'रचित' माहितीवर आधारीत बातमी

India Threatens Jail for Facebook, Whatsapp and Twitter Employees अशा मथळ्याखाली 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने ५ मार्च २०२१ रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. खोट्या आणि रचित माहितीवर आधारीत बातमीसंबंधी वॉल स्ट्रीट जर्नलला अधिकृतरित्या सूचित करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले. 

ठाकरे सरकार युवाविरोधी, तरुणांना लसीकरणापासून ठेवले वंचित; भाजपची टीका

दरम्यान, फेसबुकने हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावर १२ हजारपेक्षा जास्त पोस्ट दिसणे बंद झाले होते. या पोस्टमध्ये कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली होती. त्यानंतर, काही युजर्संने फेसबुकच्या या हॅशटॅग ब्लॉकच्या घटनेची ट्विटरवरुन तक्रार केली. त्यावेळी, हॅशटॅग #ResignModi हा कंटेट आमच्या फेसबुक कम्युनिटी स्टँडर्सच्या विरुद्ध आहे, असा मेसेज युजर्संना दिसत होता. दरम्यान, याप्रकरणी फेसबुककडून स्पष्टीकरण देण्यात आले. 
 

Web Title: central govt not asked facebook to block hashtag about resign modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.