Corona Death: आता खरा आकडा सांगा! ऑक्सिजन मृत्यूंवरून मोदी सरकार अ‍ॅक्शनमध्ये, राज्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:21 PM2021-07-27T20:21:07+5:302021-07-27T20:22:24+5:30

Corona Oxygen shortage Death: केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टेचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला उघडपणे घेरण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावरून संकटात आल्याने केंद्र सरकारने देखील यावर कडक पाऊल उचलले आहे.

central government sought report on Oxygen shortage death corona second wave from States monsoon session | Corona Death: आता खरा आकडा सांगा! ऑक्सिजन मृत्यूंवरून मोदी सरकार अ‍ॅक्शनमध्ये, राज्यांना आदेश

Corona Death: आता खरा आकडा सांगा! ऑक्सिजन मृत्यूंवरून मोदी सरकार अ‍ॅक्शनमध्ये, राज्यांना आदेश

googlenewsNext

संसदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना देशात ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू (Oxygen shortage death) झाला नसल्याची केंद्रीय मंत्र्याने म्हटल्याने केंद्र सरकारवर मोठी नामुष्की ओढवली होती. राज्यांनीच तशी आकडेवारी दिल्याने केंद्र सरकारने शून्य मृत्यू झाल्याचे सांगितले असले तरीदेखील राजकीय वातावरण तापू लागल्याने मोदी सरकारने यावर अहवाल मागविला आहे. (Centre seeks data from states, UTs on deaths due to oxygen shortage during second wave)

Covishield घेतली असेल तर सावध रहा! नव्या साईड इफेक्टने वाढविल्या चिंता; WHO चा इशारा

केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला उघडपणे घेरण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावरून संकटात आल्याने केंद्र सरकारने देखील यावर कडक पाऊल उचलले आहे. मोदी सरकारने आता राज्य सरकारांकडून खरे आकडे मागितले आहेत. राज्य सरकारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) ऑक्सिजन न मिळाल्याने किती रुग्णांचा मृत्यू झाला याची आकडेवारी मागितल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने झालेल्या मृत्यूंची आकडेवीरी पावसाळी अधिवेशनातच मांडली जाऊ शकते. हे आकडे १३ ऑगस्टला संसदेत सांगितले जाऊ शकतात, असे सुत्रांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती संसदेत दिली होती. र्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नियमितपणे केंद्र सरकारकडे कोविड- १९ मुळे झालेल्या मृत्यूसंख्येची माहिती द्यावी. सध्या तरी देशात ऑक्सिजनअभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. यावरून काँग्रेसने त्यांच्याविरोधात राज्यसभेत विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस दिली होती. 

Web Title: central government sought report on Oxygen shortage death corona second wave from States monsoon session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.