CBSE Result : CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 04:56 PM2021-07-30T16:56:13+5:302021-07-30T16:56:55+5:30

CBSE Result : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे.

CBSE Result : Congratulations to CBSE 12th pass students from Prime Minister Narendra Modi, valuable advice | CBSE Result : CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला

CBSE Result : CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला

Next
ठळक मुद्देज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे.

नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने शुक्रवारी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 99.37  टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायेस्ट पासिंग परसेंटेज निकाल आहे. तरीही, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. या निकालानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे. 

पंतप्रधाननरेंद्र मोदींनी ट्विट करुन, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे. तसेच, ज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा उर्जास्थान आहे. माझ्या नेहमीच शुभेच्छा... अशा शब्दात मोदींनी कोरोना कालावधीतील निकालाकडे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय. 


यंदाच्या वर्षी बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे गेलेल्या बॅचने एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना केला आहे. शैक्षिणक क्षेत्रानेच गेल्या वर्षभरात अनेक बदल पाहिले आहेत. तरीही, सध्याच्या सामान्य परिस्थितीशी जुळवून घेत सर्वोत्तम योगदान दिले, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन... असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, यंदाच्या परीक्षेतही परत एकदा मुलींनी बाजी मारलेली दिसत आहे. यंदा मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 0.54% ने जास्त आहे. यंदाच्या परीक्षेत 99.67 मुली तर 99.13 टक्के मुलं पास झाली. सलग सहाव्या वर्षी मुलींना बाजी मारलेली आहे. 

निकालाचा फॉर्म्युला
बोर्डान ठरवलेल्या क्रायटेरियानुसार, यंदाचा 12वीचा निकाल 30:30:40 फॉर्म्युलानुसार लावण्यात आला आहे. यात 10वी आणि 11वीतील 5 पैकी 3 सर्वाधिक गुण असलेल्या विषयांना ग्राह्य धरले आहे. तर, 12वीच्या यूनिट, टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या आधारे टक्केवारी काढण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी रिझल्ट कसा पाहावा ?
निकाल पाहण्यासाठी CBSE ची अधिकृत साइट cbseresults.nic.in वर जाऊन 12वी CBSE Results 2021 लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लॉगइन करुन आपला निकाल पाहता येईल. विद्यार्थी यावरुन निकालाची प्रिंटदेखील काढू शकतात.
 

Web Title: CBSE Result : Congratulations to CBSE 12th pass students from Prime Minister Narendra Modi, valuable advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.