CBSE Evaluation Criteria: तुम्हाला 12वीत किती मार्क्स मिळणार? अशा पद्धतीनं स्वतःच तयार करा आपला रिझल्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 01:15 PM2021-06-17T13:15:53+5:302021-06-17T13:19:05+5:30

विद्यार्थ्यंची फायनल मार्कशीट 30-30-40 फॉर्म्यूला वापरून तयार केली जाईल. विद्यार्थी आपल्या मागील परीक्षांतील मार्क्स पाहून स्वतःच रिझल्ट तयार करू शकतात.

CBSE board evaluation criteria released check how to create your marksheet | CBSE Evaluation Criteria: तुम्हाला 12वीत किती मार्क्स मिळणार? अशा पद्धतीनं स्वतःच तयार करा आपला रिझल्ट 

CBSE Evaluation Criteria: तुम्हाला 12वीत किती मार्क्स मिळणार? अशा पद्धतीनं स्वतःच तयार करा आपला रिझल्ट 

Next

नवी दिल्ली - सीबीएसई (CBSE) बोर्डाने इंटरमीडिएट बोर्ड परीक्षांचा रिझल्‍ट तयार करण्यासाठी फॉर्म्यूला तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना आज बोर्डाने सांगितले, की गेल्या वर्षांतील मार्किंग स्‍किम पाहून निश्चित करण्यात आले आहे, की 10वी, 11वी आणि 12वीच्या इंटरनल परीक्षांमधील मार्क्‍सच्या आधारेच इंटरमीडिएटचा रिझल्‍ट तयार करण्यात येईल. हा फॉर्म्यूला वापरून आपण स्वतःच आपला निकाल तयार करू शकता. (CBSE board evaluation criteria released check how to create your marksheet)

बोर्डाने म्हटले आहे, की या निकालात 10वी-11वीतील मार्क्सचे वेटेज 30-30 टक्के असेल. तर12वीच्या मार्क्सचे वेटेज 40 टक्के असेल. 10वीतही विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा होतात. मात्र, विषय वेगळे असतात. यामुळे 10वीच्या 5 विषयांपैकी सर्वात चांगल्या 3 विषयांच्या मार्क्सचाच विचार केला जाईल. यानंतर 11वीची टर्म-परीक्षा, युनिट परीक्षा आणि फायनल परीक्षेतील सर्व 5 विषयाचे अॅव्हरेज मार्क्‍स जोडले जातील. या मार्क्सचे वेटेज 30-30 टक्के असेल.

CoronaVirus : ...तर राज्यात 2 ते 4 आठवड्यांत धडकू शकते कोरोनाची तिसरी लाट, कोवीड-19 टास्क फोर्सचा इशारा

यानंतर 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्री बोर्ड परीक्षेच्या मार्क्सना 40 टक्के वेटेज दिले जाईल. हे तीनही मार्क्स एकत्रित करून एकूण 100 पैकी मार्क्स मिळतील. विद्यार्थ्यंची फायनल मार्कशीट हाच 30-30-40 फॉर्म्यूला वापरून तयार केली जाईल. विद्यार्थी आपल्या मागील परीक्षांतील मार्क्स पाहून स्वतःच रिझल्ट तयार करू शकतात. बोर्डाकडून ऑगस्ट महिन्यात निकाल जारी केला जाऊ शकतो.

Web Title: CBSE board evaluation criteria released check how to create your marksheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.