CBSE 10th results will be announced today | सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल बुधवार १५ जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय मनुष्यभळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी ट्विटरवर ही घोषणा केली.

दंगलीमुळे दिल्लीच्या काही भागांत पूर्ण न झालेली ही परीक्षा पुन्हा घेतली जायची होती. पण नंतर ती रद्द केली गेली. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे १५ जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर केला जाणार होता.
निकाल पाहण्यासाठी वेबसाईट - www.cbseresults.nic.in, www.results.nic.in.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CBSE 10th results will be announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.