CBI Raid Lalu Prasad Yadav: तुरुंगातून सुटून महिना झाला नाही तोच सीबीआय दारी; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 08:56 AM2022-05-20T08:56:04+5:302022-05-20T10:00:58+5:30

न्यूज एजन्सी एएनआयनुसार सीबीआयने आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे.

CBI raid Lalu Prasad Yadav: CBI raids Lalu Prasad's house early in the morning; Case of being Railway recruitment | CBI Raid Lalu Prasad Yadav: तुरुंगातून सुटून महिना झाला नाही तोच सीबीआय दारी; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच छापेमारी

CBI Raid Lalu Prasad Yadav: तुरुंगातून सुटून महिना झाला नाही तोच सीबीआय दारी; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच छापेमारी

googlenewsNext

चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांना गेल्याच महिन्यात जामीन मिळाला आहे. मात्र, आज सकाळी सकाळीच सीबीआयच्या टीमने त्यांच्या निवासस्थानासह १५ ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली आहे. एक टीम राबडी देवींच्या सरकारी निवासस्थानीदेखील पोहोचली आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

राबडीदेवींच्या घरी आलेल्या टीममध्ये महिला आणि पुरुष अधिकारी आहेत. या टीममध्ये १० अधिकारी आहेत. राबडींच्या घरी कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

सीबीआयची टीम इथे कशासाठी आलीय याची माहिती दिली जात नाहीय. तरी देखील सूत्रांनी रेल्वे भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने छापे टाकल्याचे सांगितले आहे. लालू प्रसाद जेव्हा रेल्वेमंत्री होते तेव्हाचे प्रकरण आहे, अद्याप यावर अधिकृत खुलासा झालेला नाही. 

न्यूज एजन्सी एएनआयनुसार सीबीआयने आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. लालू यांच्या या नव्या प्रकरणी दिल्ली ते बिहार असे एकूण १७ ठिकाणी छापेमारी सुरु आहे. 
 

Read in English

Web Title: CBI raid Lalu Prasad Yadav: CBI raids Lalu Prasad's house early in the morning; Case of being Railway recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.