Captain Amarinder Singh नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत, Punjab Vikas Party असेल पक्षाचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 08:57 AM2021-10-16T08:57:40+5:302021-10-16T08:58:14+5:30

Captain Amarinder Singh : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे स्वत:चा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनुसार त्यांच्या पक्षाचे संभाव्य नाव ‘Punjab Vikas Party किंवा आप विकास पार्टी’ असेल.  

Captain Amarinder Singh is preparing to form a new party, Punjab Vikas Party will be the name of the party? | Captain Amarinder Singh नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत, Punjab Vikas Party असेल पक्षाचे नाव?

Captain Amarinder Singh नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत, Punjab Vikas Party असेल पक्षाचे नाव?

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली :   पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे स्वत:चा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनुसार त्यांच्या पक्षाचे संभाव्य नाव ‘पंजाब विकास पार्टी किंवा आप विकास पार्टी’ असेल.   समर्थक आणि दिल्लीतील शुभचिंतकांशी सल्लामसलत करेपर्यंत ते काही आठवडे वाट पाहतील.  पंजाब विधानसभा त्रिशंकू अस्तित्वात यावी,  जेणेकरून काही मोजक्या आमदारांना नवीन सरकारचे भवितव्य ठरविता येईल, अशी ही खेळी आहे.
सध्यातरी काँग्रेसचे बव्हंशी आमदार काँग्रेसचा राजीनामा देणार नाहीत, हे या घडीला स्पष्ट दिसते. काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट नाकारले  तरच, ते चांगला पर्याय शोधण्यासाठी काँग्रेसचा राजीनामा देण्याचा विचार करतील. बरेच आमदार आम आदमी पार्टीच्या संपर्कात आहेत. आम आदमी पार्टीला नको असलेल्यांसाठी सुखबीर सिंग बादल यांचा अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीचा पर्याय खुला आहे. आपल्यासोबत कोण-कोण येतील, यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग स्थितीची चाचपणी करीत आहेत. 

Web Title: Captain Amarinder Singh is preparing to form a new party, Punjab Vikas Party will be the name of the party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app