Whatsapp-Facebook विरोधात व्यापाऱ्यांचे मोदी सरकारला पत्र; बंदी घालण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 10:06 AM2021-01-11T10:06:59+5:302021-01-11T10:12:35+5:30

Whatsapp New Privacy Policy : CAIT ने व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावं अशी मागणी केली आहे.

cait asks government to ban whatsapp and facebook over new privacy policy | Whatsapp-Facebook विरोधात व्यापाऱ्यांचे मोदी सरकारला पत्र; बंदी घालण्याची केली मागणी

Whatsapp-Facebook विरोधात व्यापाऱ्यांचे मोदी सरकारला पत्र; बंदी घालण्याची केली मागणी

Next

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा धसका घेतला असून त्याच्यासारखाच दुसरा पर्याय सध्या शोधत आहेत. याच दरम्यान देशातील व्यापाऱ्यांची अग्रणी संस्था, दी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने रविवारी (Confederation of All India Traders) व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून CAIT ने व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावं अशी मागणी केली आहे.

"सरकारने व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखलं पाहिजे अथवा व्हॉट्सअ‍ॅपवरच बंदी घातली पाहिजे. व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात 20 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीचा पर्सनल डेटा हा अत्यंत महत्त्वाचा असून जर त्या डेटाचा गैरवापर झाला तर फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो" असं CAIT ने आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपने बुधवारी युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा यूज करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या युजसाठी या नियम व अटीला अ‍ॅक्सेप्ट करावे लागणार आहे. जर अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केले जाईल असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या घोषणेनंतर युजर्सची चिंता वाढली आहे. प्रायव्हसीला धोका नसेल आणि वापरायला ही अगदी सोपं असेल अशा अ‍ॅपचा शोध युजर्स घेत आहेत. याच दरम्यान अल्पावधीतच एका अ‍ॅपची क्रेझ वाढली आहे.

Whatsapp च्या नव्या पॉलिसीचा युजर्सने घेतला धसका; अल्पावधीत "या" नव्या मेसेजिंग अ‍ॅपची वाढली क्रेझ 

सध्या सिग्नल मेसेंजर (signal massenger) ला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत युजर्संची संख्या ही झपाट्याने वाढल्याने सिग्नल मेसेंजरवर व्हेरिफिकेशन कोड उशिराने येत आहे. या अ‍ॅपने युजर्संला जोडण्यासाठी एक गाईडलाइन जारी केली आहे. सिग्नल पर्सनल डेटा मागत नाही तर फक्त तुमचा फोन नंबर स्टोर करतो. सिग्नलने डिसेंबर 2020 मध्ये आपल्या लेटेस्ट व्हर्जनसोबत एक ग्रूप कॉल लाँच केले आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून फक्त तुमचा फोन नंबर स्टोर करतो. तर टेलिग्राम पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून कॉन्टॅक्ट इन्फो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर आयडी मागतो. गुरुवारी सिग्नलने ट्विट करून अनेक प्रोव्हाइडर्स कडे व्हेरिफिकेशन कोड लेट आले. कारण, नवीन लोक मेसेजिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्मवर जोडण्याचा प्रयत्न करीत होते. कंपनीने एक गाईडलाइन सुद्धा शेअर केली आहे. 

सिग्नल जॉइन करायचंय? मग "हे" करा 

- सिग्नलवर सर्वात आधी एक ग्रूप (Group) करा.

- ग्रूप सेटिंग्सवर जा आणि ग्रूप लिंकवर (Group link)  टॅप करा.

- ग्रूप लिंक क्रिएटसाठी टॉगल (Toggle) ऑन करा आणि शेअरवर टॅप करा.

- यानंतर तुमच्या आवडीच्या जुन्या मेसेंजर अ‍ॅपवर शेअर करा.

Web Title: cait asks government to ban whatsapp and facebook over new privacy policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.