CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:01 PM2020-01-31T13:01:10+5:302020-01-31T13:04:13+5:30

CAA मुळे नारगिकत्वाबाबतची तरतूद बदण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

CAA has not changed the 'that' provision in the Citizenship Act; Important disclosure from the President | CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा

CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (CAA) सध्या देशातील वातावरण तापले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्यात आहे. मात्र CAA मुळे नारगिकत्वाबाबतची तरतूद बदण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असली तरी या कायद्यातील मूळ तरतुदी बदललेल्या नाहीत, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले आहे. 

आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, भारताप्रति आस्था आणि श्रद्धा असणारे आणि भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जगातील सर्व पंथाच्या व्यक्तींसाठी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी यापूर्वी जी प्रक्रिया अस्तित्वात होती, ती आजही कायम आहे,'' 



 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये सरकारने गेल्या सात महिन्यांत घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केला. तसेच सध्या वादाचे केंद्र बनलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला. हा कायदा करून सरकारने महात्मा गांधींच्या इच्छेची पूर्तता केली, असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट 

CAA, NRC विरोधात विरोधी पक्षांचे संसदेच्या आवारात आंदोलन

पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांनाही देणार भारताचं नागरिकत्व - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 

आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, ''भारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे. फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जे नागरिक पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत. ते भारतात येऊ शकतात, असे राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांनी सांगितले होते. अशा नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्झ करून देणे हे भारताचे कर्तव्य आहे. बापूजींच्या विचारांना पाठिंबा देताना अनेक राजकीय पक्षांनी हा विचार पुढे नेला याचा मला आनंद आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करून त्यांच्या इच्छेचा मान राखला याचे मला समाधान आहे. 

Web Title: CAA has not changed the 'that' provision in the Citizenship Act; Important disclosure from the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.