'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 05:31 PM2021-09-20T17:31:39+5:302021-09-20T17:35:37+5:30

'आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही.'

'Bureaucrats are nothing, they pick up our slippers'; controversial statement by bjp leader Uma Bharati | 'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त वक्तव्य

'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त वक्तव्य

googlenewsNext

भोपाळ: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देशातील ब्युरोक्रसीवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी ब्यूरोक्रसी म्हणजेच नोकरशाहीला चप्पल उचलणारे म्हटलं आहे. 'नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमच्या चपला उचलण्याचे काम करतात,' असं उमा भारती म्हणाल्या.

ब्युरोक्रसी चपला उचलण्यासाठी
मध्य प्रदेशात दारुबंदीविरोधात आंदोलन सुरू करणाऱ्या उमा भारती शिवराज सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहेत. आता त्यांच्या या ब्युरोक्रसीवर केलेल्या वक्तव्यामुळे सरकारच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. उमा भारती म्हणाल्या की, 'नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमची चप्पल उचलण्यासाठी आहे. ते आमच्या चपला उचलतात. तुम्हाला काय वाटतं नोकरशाह नेत्याला फिरवतात, तसं अजिबात नाही.' 

आम्ही त्यांना पगार देतो...
'आधी खाजगीत चर्चा केली जाते, नंतर नोकरशाह फाइल बनवून आणतात. आमच्या सांगण्याशिवाय ते काहीच काम करत नाहीत. आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. ब्युरोक्रसीच्या बहाण्याने आम्हीच राजकारण करतो', असं वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केलं आहे.

मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत

ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाने इशारा दिला होता की, मध्य प्रदेश सरकारला ओबीसी महासभेच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा ओबीसी महासभा रस्त्यावर उतरून भाजप खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा तीव्र विरोध करेल. या दरम्यान, ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाशी बोलताना उमा भारती यांनी नोकरशाहीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली.

Web Title: 'Bureaucrats are nothing, they pick up our slippers'; controversial statement by bjp leader Uma Bharati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.