अरे व्वा! नोकरी गेली पण हार नाही मानली; कष्टाच्या जोरावर शेतीतून लाखोंचं उत्पन्न मिळवून कमाल केली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 02:43 PM2021-01-05T14:43:42+5:302021-01-05T15:10:42+5:30

Organic Farming : एका तरुण शिक्षकाने कोरोनाच्या संकटात नोकरी गेल्यानंतर आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करत स्थानिक शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

bundi this young teacher turned disaster into opportunity organic farming is being discussed far | अरे व्वा! नोकरी गेली पण हार नाही मानली; कष्टाच्या जोरावर शेतीतून लाखोंचं उत्पन्न मिळवून कमाल केली

अरे व्वा! नोकरी गेली पण हार नाही मानली; कष्टाच्या जोरावर शेतीतून लाखोंचं उत्पन्न मिळवून कमाल केली

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावरचे पोट असणाऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. याच दरम्यान अनेकांनी परिस्थिती समोर हार न मानता वेगळ्या मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला. अशीच एक कौतुकास्पद घटना राजस्थानमध्ये घडली आहे. कोरोनाच्या काळात नोकरी गमावलेल्या एका बेरोजगार तरुणाने संकटाचं रुपांतर आपल्या कष्टाच्या जोरावर संधीत केलं आहे. शेतात विविध प्रयोग करून तरुणाने कमाल केली आहे.

राजस्थानच्या एका तरुण शिक्षकाने कोरोनाच्या संकटात नोकरी गेल्यानंतर आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करत स्थानिक शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्याने एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यात 33 क्विंटल मक्याचे उत्पादन घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तरुणाने ऑर्गेनिक शेतीच्या माध्यमातून (Organic farming) ही कमाल केली आहे. लेखराज सिंह हाडा असं या तरुणाचं नाव असून ते राजस्थानमधील धोवडा येथील रहिवासी आहेत. कोरोनाच्या काळात आपली शिक्षकाची नोकरी गेल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपले ऑनलाईन क्लास सुरू ठेवत शेतीमध्ये अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केली. 

जैविक खत तयार करून ते आपल्या शेतीमध्ये वापरतात

आपल्या शेतीमध्ये जैविक खत तयार करण्यासाठी हाडा बाहेरून गोमूत्र विकत घेतात. यासाठी ते प्रति 30 लिटर गोमुत्रासाठी 100 रुपये खर्च करत आहेत. जैविक खत तयार करून ते आपल्या शेतीमध्ये वापरतात. तसेच त्यांनी संपूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने उसाची शेती देखील केली असून शेणखत 5000 लीटर वेस्ट डी कंपोजरच्या मदतीने उसाची लागवड केली आहे. यांचबरोबर या तयार होणाऱ्या उसापासून ते गूळ तयार करणार असून यामध्ये काजू, बदाम आणि शेंगदाण्याचा वापर करून याची ब्रँडींग करून ते स्वतः विक्री करणार आहेत. ऑर्गेनिक शेतीच्या माध्यमातून ते सध्या लाखोंचं उत्पन्न मिळवत आहेत. 

अवघ्या 1 लाखांमध्ये ग्रीन हाऊस केले उभे

लेखराज सिंह हाड  यांनी आपल्या वडिलांपासून प्रेरणा घेत बांबू आणि तारांच्या मदतीने ग्रीन हाऊस उभे केले आहे. पाच ते सहा लाख रुपये खर्च करून तयारा होणारे ग्रीन हाऊस त्यांनी अवघ्या 1 लाखांमध्ये उभे केले. हाडा यांनी आपल्या ग्रीनहाऊसमध्ये टोमॅटो, वांगीची शेती देखील केली आहे. तसेच पेरू, मेथी, वाटाणा, पालक याची देखील लागवड केली आहे. त्यांनी ही पिके पूर्णपणे ऑरगॅनिक पद्धतीने लावण्यात आली आहेत. त्यांच्याकडे पेरूची झाडं असून यासाठी देखील ते पूर्णपणे जैविक खाद्य वापरत आहेत. यासाठी ते धोत्रा, गोमूत्र, मोह, केशर,कडुनिंब इत्यादींचे मिश्रण करुन सेंद्रिय औषध तयार करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

लय भारी! लॉकडाऊनमधला वेळ लावला सत्कारणी; सुपारीवर तयार केल्या जबरदस्त, शानदार कलाकृती

लॉकडाऊनमधला रिकामा वेळ एका व्यक्तीने सत्कारणी लावून कमाल केली आहे. तांदूळ, पेन्सिलचं टोक, नारळ यांच्यावर सुंदर कालकृती केलेल्या याआधी अनेकांनी पाहिल्या आहेत. मात्र आता छोट्याशा सुपारीवर जबरदस्त, शानदार कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. गुजरातच्या सूरतमध्ये पवन शर्मा यांनी लॉकडाऊनमध्ये सुपारीवर आपलं कौशल्य दाखवलं आहे. राम मंदिर, श्री गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कलाकृती तयार केल्या आहेत. यासोबतच अगदी चहाच्या कपाच्या कलाकृतीपासून नावांपर्यंत सुपारीवर उत्कृष्ट पद्धतीने कोरीव काम केलं आहे. पवन यांनी 2021 नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास सुपारीपासून हॅपी न्यू इयर तयार केलं आहे. पवन शर्मा यांनी सुपारीवर आतापर्यंत जवळपास 60 कलाकृती तयार केल्या आहेत. त्यांच्या या कलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
 

Web Title: bundi this young teacher turned disaster into opportunity organic farming is being discussed far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.