खारफुटीचे जंगल वाचविण्यासाठी बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनमध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 01:57 AM2019-06-30T01:57:19+5:302019-06-30T01:57:38+5:30

स्थानकाच्या नव्या आराखड्यामुळे नष्ट होणाऱ्या खारफुटीच्या झाडांची संख्या ५३ हजारांवरून ३२,०४४ वर येईल.

 Bullet train changed to Thane station to save the mangroves | खारफुटीचे जंगल वाचविण्यासाठी बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनमध्ये बदल

खारफुटीचे जंगल वाचविण्यासाठी बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनमध्ये बदल

googlenewsNext

नवी दिल्ली : खारपुटीच्या जंगलाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे येथील स्थानकाच्या आराखड्यात (डिझाईन) बदल करण्यात आला आहे, असे राष्ट्रीय उच्चगती रेल्वे मंडळाने म्हटले आहे. स्थानकाच्या नव्या आराखड्यामुळे नष्ट होणाऱ्या खारफुटीच्या झाडांची संख्या ५३ हजारांवरून ३२,०४४ वर येईल.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, आवश्यक असलेल्या वन्यजीव, वन आणि सीआरझेड मंजुºया घेण्यात आल्या आहेत. वन विभागाने काही अटींवर मंजुरी दिली आहे. यातील एक अट ठाणे स्थानकाच्या आराखड्यात बदल करावी, अशी आहे. खारफुटीच्या जंगलाचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी ही अट वन विभागाने घातली आहे. स्थानकाचे स्थान न बदलता जंगल वाचविण्याबाबत जपानी अभियंत्यांसोबत आम्ही चर्चा केली आहे.

Web Title:  Bullet train changed to Thane station to save the mangroves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.