हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 16:55 IST2025-12-07T16:54:00+5:302025-12-07T16:55:59+5:30
एका १३ वर्षांच्या मुलीचा फुगा फुगवताना मृत्यू झाला.

हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा फुगा फुगवताना मृत्यू झाला. अचानक फुग्यातील रबरचा तुकडा तिच्या तोंडात शिरला आणि श्वास नलिकेत अडकला, ज्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
बुलंदशहरच्या पहासू भागातील दिघी गावात ही धक्कादायक घटना घडली. आठवीत शिकणारी १३ वर्षांची कुमकुम हिने गावातील एका दुकानातून एक फुगा विकत घेतला आणि तिच्या धाकट्या भावाला फुगा फुगवून देण्यासाठी घरी आली.
फुगा फुगवताना तो अचानक तिच्या तोंडात फुगा फुटला आणि फुग्यातील रबराचा तुकडा तिच्या श्वास नलिकेत अडकला. यानंतर कुटुंबीयांनी कुमकुमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.
घटनेची माहिती देताना पाहसू पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक कुमार म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात जाऊन माहिती गोळा केली. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, तिच्या श्वास नलिकेमध्ये फुग्याचा रबराचा तुकडा अडकल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणात कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही.