Budget 2020 Impact : अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 04:20 PM2020-02-01T16:20:58+5:302020-02-01T16:36:28+5:30

Budget 2020 Impact : अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न

Budget 2020 Things that got cheaper and dearer | Budget 2020 Impact : अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त

Budget 2020 Impact : अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त

googlenewsNext

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यामधून त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला. अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले आहेत. पाच ते साडेसात लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना फक्त 10 टक्के कर आकारला जाणार आहेत. 5 ते 7.5 लाखदरम्यान करपात्र उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के कर वसूल केला जाणार आहे. तर 7.50 ते 10 लाखांसाठी 15 टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच 10 ते 12.5  लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 20 टक्के कर आकारला जाणार आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12.5 ते 15 लाख आहे, त्यांच्याकडून 25 टक्के कर आकारला जाणार आहे. वार्षिक उत्पन्न 15 लाखांहून अधिक असणाऱ्यांकडून 30 टक्के प्राप्तिकर आकारला जाणार आहे. 

करदात्यांना दिलासा देताना काही वस्तू आणि सेवांचे दर वाढवण्यात आले आहेत. तर काही वस्तू आणि सेवा स्वस्त करण्यात आल्या आहेत. हे नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील.

काय महाग?
- सिगारेट, तंबाखू पदार्थ
- आयात केलेलं फूटवेअर, फर्निचर
- आयात केलेली वैद्यकीय उपकरणं 
- वॉल फॅन्स
- चायना सिरॅमिक, स्टील, तांब्यापासून तयार करण्यात येणारी क्रॉकरी, स्वयंपाकाची भांडी
- मोबाईल
- वाहनं आणि वाहनांचे सुटे भाग

काय स्वस्त?
- लाईट वेट कोटेड पेपर
- प्रक्रिया न केलेली साखर
- अ‍ॅग्रो-अ‍ॅनिमल बेस्ड उत्पादनं
- फॅट्स काढण्यात आलेलं दूध
- अल्कोहोलचा समावेश असलेली काही विशिष्ट पेयं
- सोया फायबर, सोया प्रोटीन
 

Read in English

Web Title: Budget 2020 Things that got cheaper and dearer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.