Budget 2020: बजेटची दोन पानं शिल्लक असतानाच राजनाथ सिंहांनी अर्थमंत्र्यांना थांबवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 04:23 PM2020-02-01T16:23:51+5:302020-02-01T16:24:40+5:30

2003 मध्ये एनडीएच्या काळात, तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सलग 2 तास 13 मिनिटे भाषण देण्याचा विक्रम केला होता

Budget 2020: Rajnath Singh stops finance minister speech while two pages of budget are left ... | Budget 2020: बजेटची दोन पानं शिल्लक असतानाच राजनाथ सिंहांनी अर्थमंत्र्यांना थांबवलं अन्...

Budget 2020: बजेटची दोन पानं शिल्लक असतानाच राजनाथ सिंहांनी अर्थमंत्र्यांना थांबवलं अन्...

Next

नवी दिल्ली -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सुमारे 2 तास 39 मिनिटं त्यांनी सलगपणे अर्थसंकल्प मांडला. पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय भाषणामध्ये एक नवा विक्रम निर्मला सीतारामन यांनी निर्माण केला. भारताच्या इतिहासामधील हे सर्वात प्रदीर्घ भाषण आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे बजेट भाषण जवळपास 2 तास 39 मिनिटं चालले, हे भाषण अजून काही मिनिटे लांबले असले मात्र तत्पूर्वी भाषण वाचताना त्यांची तब्येत बिघडल्याचं दिसून आलं. यानंतर  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना भाषण संपविण्याचा सल्ला दिला त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण संपवले आणि उर्वरित भाषण सभागृहात पटलावर ठेवले. 

Budget 2020 Important Highlights : अर्थसंकल्प 2020 मधील महत्त्वाच्या घोषणा

सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

यावेळी राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलले, गडकरींनी त्यांच्या जवळीत चॉकलेट सीतारामन यांना दिलं. मात्र त्यांनी ते घेतलं नाही. निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात निर्मला सीतारामन यांनी दुसरे बजेट सादर केले. पहिल्या बजेट भाषणात त्यांनी सर्वाधिक प्रदीर्घ बजेट भाषण करण्याचा विक्रमही केला. 
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकारने अंतरिम बजेट सादर केला. 5 जुलै रोजी सादर केलेले त्यांचं अंतरिम बजेट भाषण 2 तास 17 मिनिटांचं झालं होतं. यंदाचं भाषण करुन त्यांनी जुना ७ महिन्याचा त्यांचाच विक्रम मोडला आहे. 

अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारात प्रचंड निराशा, सेंसेक्स 650 अंकांनी घसरला 

'अर्थसंकल्पातून मुंबई अन् महाराष्ट्राच्या पदरी निराशा; केंद्राचं कुचकामी बजेट'

2003 मध्ये एनडीएच्या काळात, तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सलग 2 तास 13 मिनिटे भाषण देण्याचा विक्रम केला होता, जो निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीच हा रेकॉर्ड  मोडला. निर्मला सीतारामन यांच्यापूर्वी देशाचे अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली होते. त्यांनी 2018 मध्ये त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना 1 तास 49 मिनिटे भाषण केले. त्यात 18,604 शब्दांचा वापर करण्यात आला होता. 2015 मध्ये अरुण जेटली यांनी सुमारे 2 तास 10 मिनिटे भाषण केले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा

मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा अर्थसंकल्पात उल्लेखच नाही: बच्चू कडू

'साल भर का गम जनता को इनाम दिया है' अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून खिल्ली 

...तरच तुम्हाला मिळेल इन्कम टॅक्सच्या नव्या दरांचा फायदा; 'ही' आहे महत्त्वाची अट

आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाही

Web Title: Budget 2020: Rajnath Singh stops finance minister speech while two pages of budget are left ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.