BSF VIDEO: कडाक्याची थंडी अन् चहुबाजूने बर्फ; पाहा बीएसएफ जवानाचा जोशाने भरलेला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:20 PM2022-01-24T13:20:07+5:302022-01-24T13:20:58+5:30

BSF VIDEO: व्हिडीओमध्ये बीएसएफचा जवान कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फाच्छादित भागात पुश अप करताना दिसत आहे. हा जवान अवघ्या 40 सेकंदात 47 पुश अप मारतो.

BSF VIDEO: Extreme cold and snow all around; soldier did push-ups; Watch video of BSF jawans | BSF VIDEO: कडाक्याची थंडी अन् चहुबाजूने बर्फ; पाहा बीएसएफ जवानाचा जोशाने भरलेला व्हिडिओ

BSF VIDEO: कडाक्याची थंडी अन् चहुबाजूने बर्फ; पाहा बीएसएफ जवानाचा जोशाने भरलेला व्हिडिओ

googlenewsNext

नवी दिल्ली: परिस्थिती कशीही असो, भारतीय सुरक्षा दलांचा (Indian Security Forces)  उत्साह नेहमीच उंचावलेला असतो. प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे रक्षण करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय असते. बर्फाळ भागातून सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत जवानाचा जोश पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जवानाचा हा व्हिडिओ बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन (@BSF_India) शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक बीएसएफ जवान कडाक्याच्या थंडीत बर्फाळ भागात कसरत करताना दिसत आहे. कठीण परिस्थितीतही जवानाची चपळता पाहून सर्वजण त्या जवानाच्या जोशाचे कौतुक करत आहेत.

40 सेकंदात 47 पुशअप

व्हिडीओमध्ये बीएसएफचा जवान कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फाच्छादित भागात पुश अप करताना दिसत आहे. हा जवान अवघ्या 40 सेकंदात 47 पुश अप मारतो. यावरुन तुम्हाला सैनिकांच्या फिटनेस लेव्हलची कल्पना येऊ शकते. बीएसएफने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले- 40 सेकंद 47 पुश अप्स! फिट इंडिया चॅलेंज. ही व्हिडिओ क्लिप 31 हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. कडाक्याच्या थंडीत जवानाने ज्या वेगाने पुश-अप केले त्याचे लोक कौतुक करत आहेत.

यापूर्वीही शेअर केला व्हिडिओ
बीएसएफने याआधी आणखी एका जवानाचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो बर्फाळ भागात एका हाताने पुश-अप करताना दिसत आहे. त्याने हातात ग्लोव्हजही घातले नव्हते. या व्हिडिओवर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले- 'त्याचे सामर्थ्य धैर्य पाहून प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे.' 

Web Title: BSF VIDEO: Extreme cold and snow all around; soldier did push-ups; Watch video of BSF jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.