BSF Soldiers Firing On Colleagues : BSF च्या जवानाचा सहकाऱ्यांवरच अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 02:11 PM2022-03-06T14:11:26+5:302022-03-06T14:12:43+5:30

अमृतसर येथील खासा बीएसएफ कॅम्पमध्ये (BSF Camp)बीएसएफच्या जवानाने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर गोळी लागल्याने जखमी झालेल्या जवानांना गुरू नानक देव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत 6 जवानांना गोळी लागली होती. 

BSF Soldiar indiscriminately fire on colleagues, 5 killed in amritsar at Punjab | BSF Soldiers Firing On Colleagues : BSF च्या जवानाचा सहकाऱ्यांवरच अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

प्रतिकात्मक फोटो.

googlenewsNext

अमृतसर - पंजाबमधील अमृतसर (Amritsar) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बीएसएफच्या (BSF) जवानाने कॅम्पमध्ये आपल्या सहकारी जवानांवर अंदाधुंद गोळीबार (Firing) केला. या घटनेत 5 जवानांचा मृत्यू झाला. तर 1 जवान जखमी झाला आहे. या घटनेत फायरिंग करणाऱ्या जवानाचाही मृत्यू झाला आहे.

गोळीबारात 6 जवानांना लागली गोळी -
अमृतसर येथील खासा बीएसएफ कॅम्पमध्ये (BSF Camp)बीएसएफच्या जवानाने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर गोळी लागल्याने जखमी झालेल्या जवानांना गुरू नानक देव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत 6 जवानांना गोळी लागली होती. 

बीएसएफच्या जवानाने का केली फायरिंग? -
खरे तर, बीएसएफच्या या जवानावे फायरिंग का केली? यासंदर्भात अद्याप कसलीही माहिती मिळू शकलेली नाही. प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ही घटना भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटारी-वाघा बॉर्डर क्रॉसिंगपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या खासा भागातील बीएसएफ कॅम्पच्या कॅफेटेरियामध्ये घडली.

कोर्ट ऑफ इंक्वायरीचा आदेश -
या घटनेनंतर, बीएसएफकडून एक प्रेस रिलीजदेखील जारी करण्यात आली आहे. यात, घटनेच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इंक्वायरीचा आदेशही देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: BSF Soldiar indiscriminately fire on colleagues, 5 killed in amritsar at Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.