अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:38 IST2025-12-02T15:38:24+5:302025-12-02T15:38:53+5:30
लग्नानंतर अवघ्या २० मिनिटांत उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सासरच्या घरातून निघून गेलेल्या वधूने आता नवरदेवाला फोन करून परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
लग्नानंतर अवघ्या २० मिनिटांत उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सासरच्या घरातून निघून गेलेल्या वधूने आता नवरदेवाला फोन करून परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र नवरदेवाने स्पष्ट नकार दिला आहे. तो म्हणतो की, या घटनेने त्याची अब्रू गेली आहे आणि लग्नात खर्च केलेले ५ लाख रुपये वाया गेले आहेत. तो आता समाजात कोणालाही तोंड दाखवू शकत नाही.
२७ नोव्हेंबर रोजी मुलीने त्याला फोन करून परत येण्यास तयार असल्याचं सांगितलं, पण नवरदेवाने स्पष्ट नकार दिला. दुःख व्यक्त करताना वर म्हणाला, "माझ्याकडे आता काहीही उरलेलं नाही, माझी सर्व अब्रू गेली आहे. मी समाजात कोणालाही माझं तोंड दाखवू शकत नाही. लग्नात खर्च केलेले तब्बल ५ लाख रुपये वाया गेले"
२५ नोव्हेंबर रोजी लग्न झालं आणि वधू २६ नोव्हेंबर रोजी तिच्या सासरच्या घरी पोहोचली. लग्नानंतरच्या एका कार्यक्रमादरम्यान वधूने अचानक तिच्या कुटुंबाला फोन केला आणि ती आता सासरी राहणार नाही असं जाहीर केलं. २० मिनिटांत लग्न मोडलं. यानंतर सासरच्यांना मोठा धक्का बसला आणि बदनामीच्या भीतीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने नकार दिला.
मुलीचे कुटुंबही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने नकार दिला. शेवटी कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचे आश्वासन देऊन लेखी करार झाला. दोन्ही पक्षांनी एकमेकांचं सामान परत केलं आणि लग्न मोडलं. वधू तिच्या कुटुंबाकडे परतली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सगळीकडे या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.