सरदार पटेल जयंती; कंगनाच्या ट्विटने सर्वांना केले हैराण; महात्मा गांधी अन् नेहरूंवर साधला निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 02:14 PM2020-10-31T14:14:42+5:302020-10-31T14:24:14+5:30

"आपण एका पंतप्रधान पदाला नकार देऊन, आमच्या महान नेतृत्वाला आणि दूरदृष्टीला आमच्यापासून दूर केले. आम्हाला आपल्या निर्णयाबद्दल अत्यंत खेद वाटतो."

bollywood actress kangana ranaut tweets on sardar vallabhbhai patel birth anniversary​​​​​​​ | सरदार पटेल जयंती; कंगनाच्या ट्विटने सर्वांना केले हैराण; महात्मा गांधी अन् नेहरूंवर साधला निशाणा 

सरदार पटेल जयंती; कंगनाच्या ट्विटने सर्वांना केले हैराण; महात्मा गांधी अन् नेहरूंवर साधला निशाणा 

Next

नवी दिल्ली - बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौतने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केले आहे. तिचे हे ट्विट अत्यंत वेगाने व्हायरल होऊ लागले आहे. सरदार पटेलांच्या जयंती निमित्त कंगनाने असे काही लिहिले आहे, की ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. पटेलांच्या जयंती निमित्त कंगनाने त्यांना अभिवादन केले. याच बरोबर तिने, आपल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी आणि पंडित जवाहर लाल नेहरू यांच्यावरही टीका केली आहे.

कंगनाने ट्विट करत लिहिले, "त्यांनी गांधींना खूश करण्यासाठी भारताच्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या स्वरुपात, आपल्या सर्वात योग्य आणि निवडलेल्या पदाचे बलिदान दिले. कारण नेहरू चांगले इंग्रजी बोलतात, असे गांधींना वाटत होते. यामुळे सरदार पटेलांना नाही, तर संपूर्ण देशालाच अनेक दशके नुकसान सोसावे लागले. ज्यावर आपला अधिकार आहे, ते आपण कसल्याही प्रकारची लाज न बाळगता घ्यायला हवे."



यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट केले, यात कंगनाने म्हटले आहे, 'ते भारताचे खरे लोहपुरुष आहेत. गांधीजींनाही नेहरूंप्रमाणेच एक कमकुवत बुद्धी असलेली व्यक्ती हवी होती. जेनेकरून त्यांना त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवता येईल आणि नेहरूंना समोर करून निर्णय घेता येतील. ही एक चांगली योजना होती. मात्र, गांधी जी गेल्यानंतर जे झाले ती मोठी आपत्ती होती. #SardarVallabhbhaiPatel.'  



आणखी एका ट्विटमध्ये कंगना म्हणाली, 'भारताचे लौह पुरुष सरदार पटेल यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करते. आपण एक असे व्यक्ती होतात, ज्यांनी अम्हाला आजचा भारत दिला. मात्र, आपण एका पंतप्रधान पदाला नकार देऊन, आमच्या महान नेतृत्वाला आणि दूरदृष्टीला आमच्यापासून दूर केले. आम्हाला आपल्या निर्णयाबद्दल अत्यंत खेद वाटतो.'

Web Title: bollywood actress kangana ranaut tweets on sardar vallabhbhai patel birth anniversary​​​​​​​

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.