Indian Army, LAC: एलएसी धडधडणार! चिनी सैन्यावर बोफोर्स तोफा आग ओकणार; अरुणाचलमध्ये तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:56 PM2021-10-20T18:56:09+5:302021-10-20T18:56:51+5:30

Bofors guns deployed on LAC: चीनला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने हवाई दलाच्या मदतीने हवाई हल्ले करणारी, टेहळणी करणारी विमाने देखील तैनात केली आहेत. यामध्ये हेरॉन आय ड्रोन, सशस्त्र हेलिकॉप्टर रुद्र आणि ध्रुव तैनात करण्यात आले आहे.

Bofors guns deployed in a forward area along the Line of Actual Control in Arunachal Pradesh | Indian Army, LAC: एलएसी धडधडणार! चिनी सैन्यावर बोफोर्स तोफा आग ओकणार; अरुणाचलमध्ये तैनात

Indian Army, LAC: एलएसी धडधडणार! चिनी सैन्यावर बोफोर्स तोफा आग ओकणार; अरुणाचलमध्ये तैनात

Next

चिनी सैन्याने लडाखनंतर अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) भागात हालचाली वाढविल्या आहेत. मिसाईल, लढाऊ विमानांची तैनाती मोठ्या प्रमाणावर करू लागला आहे. यामुळे भारतानेही विश्वासघातकी चीनला जरब बसविण्य़ासाठी शत्रूच्या छातीत धडकी भरविणाऱ्या बोफोर्स तोफा एलएसीवर तैनात केल्या आहेत. 

भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशमध्ये बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत. चीन आणि भारताच्या सीमारेषा मिळतात त्या पॉईंटजवळ बुम ला पास येथे या बोफोर्स तोफा (Bofors guns) तैनात केल्या आहेत. हा भाग चीनच्या तवांग सेक्टरला जोडलेला आहे. 


याचबरोबर चीनला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने हवाई दलाच्या मदतीने हवाई हल्ले करणारी, टेहळणी करणारी विमाने देखील तैनात केली आहेत. यामध्ये हेरॉन आय ड्रोन, सशस्त्र हेलिकॉप्टर रुद्र आणि ध्रुव तैनात करण्यात आले आहे. या विंगमध्ये मोठ्या प्रमाणावर चिता हेलिकॉप्टर होते, ते आता नव्या अद्ययावत हेलिकॉप्टरनी बदलण्यात आले आहेत. आयएएनएसनुसार स्वदेशी बनावटीची ही हेलिकॉप्टर वजनाने हलकी असून डोंगराळ भागात वेगाने काम करू शकतात. यामुळे ही हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये तैनात करण्यात आली आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली स्क्वाड्रनदेखील तयार करण्यात आली आहे. 
 

Web Title: Bofors guns deployed in a forward area along the Line of Actual Control in Arunachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.