पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बहल्ला; ६ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 11:15 AM2021-03-06T11:15:12+5:302021-03-06T11:18:34+5:30

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (West Bengal Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्बहल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. (bjp workers injured in a crude bomb blast in Rampur village of South 24 Parganas district)

bjp workers injured in a crude bomb blast in Rampur village of South 24 Parganas district | पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बहल्ला; ६ जण जखमी

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बहल्ला; ६ जण जखमी

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्बहल्ला२४ परगणा जिल्ह्यातील रामपूर गावातील घटनातृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा दावा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (West Bengal Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून (BJP) आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्बहल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. या बॉम्बहल्ल्यात भाजपचे कार्यकर्ते जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (bjp workers injured in a crude bomb blast in Rampur village of South 24 Parganas district)

मिळालेल्या माहितीनुसार, २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर या गावात ही घटना घडली. या बॉम्बहल्ल्यात जखमी झालेल्या भाजपच्या सहा कार्यकर्त्यांपैकी दोन जणांची स्थिती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांकडून बॉम्बहल्ला करण्यात आला. एका लग्न समारंभावरून परतत असताना हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. 

या बॉम्बहल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. शोवन देबनाथ, विक्रम, अर्पण, स्वपन, महादेव अशी जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश

दरम्यान, गेल्या १० वर्षांपासून बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळी भाजपाने कडवे आव्हान दिले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसकडून २९१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५० महिला आणि ४२ मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेसविरोधात बंडखोरी करत भाजपमध्ये दाखल झालेल्या आणि या निवडणुकीत नंदिग्राम आणि आसपासच्या भागात तृणमूलसाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला असून, त्या नंदीग्राम येथून निवडणूक लढवणार आहेत.

Web Title: bjp workers injured in a crude bomb blast in Rampur village of South 24 Parganas district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.