Farmers Protest: मोठी कारवाई! गाझीपूर बॉर्डर झटापट प्रकरणी BKU च्या २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:32 PM2021-07-01T15:32:19+5:302021-07-01T15:33:44+5:30

Farmers Protest: या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भारतीय किसान युनियनच्या (BKU) २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR नोंदवल्याची माहिती मिळाली आहे.

bjp workers farm law protesters clash ghazipur police registered fir on 200 bku workers | Farmers Protest: मोठी कारवाई! गाझीपूर बॉर्डर झटापट प्रकरणी BKU च्या २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR

Farmers Protest: मोठी कारवाई! गाझीपूर बॉर्डर झटापट प्रकरणी BKU च्या २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR

Next

नवी दिल्ली:दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर शेतकरी केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. मात्र, याच ठिकाणी भाजप आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भारतीय किसान युनियनच्या (BKU) २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR नोंदवल्याची माहिती मिळाली आहे. (bjp workers farm law protesters clash ghazipur police registered fir on 200 bku workers)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते अमित वाल्मिकी यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. वाल्मिकी यांनी कौशंबी पोलीस स्थानकात केलेल्या लिखित तक्रारीत, भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही; कृषी कायद्यात बदल आवश्यकच”

भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांत हाणामारी

गेल्या सात महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पोहचल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. यात दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेत. सकाळी गाझीपूर सीमेवर भाजप कार्यकर्ते दाखल झाले. शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने मारहाण झाली. गोंधळाची बातमी मिळताच प्रचंड पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. 

“कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

शेतकरी आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने

भाजप नेते अमित वाल्मिकी यांच्या स्वागतासाठी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर कार्यकर्ते उभे होते. कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी व्यासपीठासमोर पोहोचला तेव्हा शेतकरी आणि भाजपमध्ये चकमक सुरू झाली. या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप टिकैत यांनी केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनीही भाजप कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली.

“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण...”; पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा सूचक इशारा!

दरम्यान, 'भाकियू'च्या वतीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. 'भाकियू'चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांना या मंचावर कब्जा करायचा आहे. हे लोक गेल्या अनेक दिवसांपासून येथे येत आहेत आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच पुन्हा आमच्या मंचावर दिसलात तर याद राखा, असा थेट इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

Web Title: bjp workers farm law protesters clash ghazipur police registered fir on 200 bku workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.