हरियाणात सत्ता राखण्यासाठी भाजपची धडपड, काँग्रेसने लावली सारी ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:04 AM2019-05-10T05:04:41+5:302019-05-10T05:05:12+5:30

हरियाणात २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने १० पैकी ७ जागा जिंकल्या होत्या व त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ३४ टक्के मते घेतली होती.

 The BJP is trying to keep power in Haryana, Congress has all the strength | हरियाणात सत्ता राखण्यासाठी भाजपची धडपड, काँग्रेसने लावली सारी ताकद

हरियाणात सत्ता राखण्यासाठी भाजपची धडपड, काँग्रेसने लावली सारी ताकद

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : हरियाणात २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने १० पैकी ७ जागा जिंकल्या होत्या व त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ३४ टक्के मते घेतली होती. भारतीय राष्ट्रीय लोकदलाची (आयएनएलडी) दोन दशके सोबत केलेल्या भाजपने स्वबळावर मिळविलेला विधानसभेचा विजय ऐतिहासिकच होता. मात्र यंदा काँग्रेसने तिथे सारी ताकद लावल्याने गणिते बदलू शकतील, अशी चर्चा आहे.

भाजपने ५ नवे उमेदवार दिले आहेत. राज्यात तिसऱ्यांदा मोदी लाटेचा लाभ मिळेल, असे भाजपचे नेते सांगत आहेत आधीच्या दोन्ही निवडणुकांत दोन विरोधी पक्षांनी मतदानातील आपला २२-२४ टक्के मतांचा वाटा कायम राखला. हरियाणा जनहित कॉँग्रेसने ६.१ टक्के मते घेतली. ही मते कॉँग्रेसच्या मतांमध्ये समाविष्ट झाल्याने कॉँग्रेसच्या मतांचा वाटा २९ टक्के झाला.
आता आयएनएलडीमध्ये फूट पडली आहे. दोन्ही गट आपणच चौधरी देवीलाल यांचा वारसा चालवित असल्याचा दावा करतात. देवीलाल यांचे तुरुंगात बंदिस्त असलेले पुत्र ओमप्रकाश चौटाला हे त्यांचे धाकटे पुत्र अभय चौटाला यांना पाठिंबा देतात. तर त्यांचे नातू दुष्यंत व दिग्विजय चौताला यांनी जननायक जनता पक्ष स्थापन स्थापन करुन आम आदमी पक्षाला साथ दिली.
कॉँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा सोनपतमधून, त्यांचे पुत्र आमदार दीपेंदर सिंह हुडा रोहतकमधून लढत आहेत. अंबाला येथून कुमारी शैलजा, तर दिवंगत भजनलाल यांचे नातू भव्य बिष्णोई हिस्सारमधून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार अवतारसिंग भदाना यांना काँग्रेसने आपल्या गोटात आणले असून, ते फरिदाबादमधून केंद्रीय मंत्री किशनपाल गुज्जर यांच्या विरोधात रिंगणात आहेत. भदाना हे गुज्जर समाजातील महत्त्वाचे नेते आहेत. ते चारदा खासदार होते. भिवानी येथून माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची नात श्रृती चौधरी यांना पुन्हा उमेदवारी दिली.
केंद्रीय पोलादमंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांच्या आयएएस’ नोकरीचा राजीनामा दिलेले पुत्र ब्रिजेंद्र सिंग यांना भाजपने हिस्सारमधून उभे केले आहे. त्यांचे आजोबा चौधरी छोटू रामहे जाट समाजाचे नेते होते. त्यामुळे यांनाही जाट मते मिळतील, असे भाजपचे गणित आहे. भाजपने आपल्या जागा ७ वरुन वाढून १० पर्यंत पोहचतील, असा दावा केला आहे. येथील सर्व जागांवर १२ मे रोजी मतदान होत आहे.

लाल आणि चौताला

येथील यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे बन्सीलाल, देवीलाल, भजनलाल व ओमप्रकाश चौताला यांची मुले वा नातवंडे रिंगणात आहेत. ओमप्रकाश चौताला हे देवीलाल यांचे पुत्र. त्यांचा मुलगा व नातू यांचे दोन गट असून, एक गट आम आदमी पार्टीबरोबर आहेत, तर दुसरा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. अभय चौताला यांचा मुलगा अर्जुन कुरूक्षेत्राच्या रिंगणात आहे. अभय यांचे बंधू अजय यांचा मुलगा दुष्यंत हिसारमधून निवडणूक लढवत आहे.

Web Title:  The BJP is trying to keep power in Haryana, Congress has all the strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.