राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे; भाजपाचा NPRवरून हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 06:26 PM2019-12-27T18:26:43+5:302019-12-27T18:28:54+5:30

'एनपीआरच्या माध्यमातून गरिबांना मदत केली जाईल'

BJP targets Rahul, says he is candidate for 2019 'lie of the year' | राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे; भाजपाचा NPRवरून हल्लाबोल 

राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे; भाजपाचा NPRवरून हल्लाबोल 

googlenewsNext

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. 

यातच केंद्र सरकारने आता देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले असून या मुद्द्यांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजपावर सतत निशाणा साधत आहेत. याला प्रतिउत्तर देताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधी 2019 मधील सर्वांत जास्त खोटारडे असून एनपीआरचा टॅक्सशी संबंध असल्याचे त्यांचे म्हणणे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. 

प्रकाश जावडेकर म्हणाले, "राहुल गांधी 2019 मधील सर्वांत खोटोरडे आहेत. भ्रष्टाचार हीच काँग्रेसची संस्कृती आहे. काँग्रेसमध्ये 2जी टॅक्स, जयंती टॅक्स आणि कोळसा टॅक्स होता. एनपीआरला गरिबांवरील टॅक्स म्हणणे हास्यास्पद आहे. एनपीआरच्या माध्यमातून गरिबांना मदत केली जाईल." 

याचबरोबर, सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. सीएएमुळे अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाणार अशी अफवा काँग्रेस आणि कंपनी पसरवत आहे. मात्र राहुल गांधी यांना मी आव्हान देतो की या कायद्यात कुठेही कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद आहे का? हे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान अमित शाह यांनी दिले आहे. 

राहुल गांधींवर घाणाघाती टीका करताना अमित शाह म्हणाले की, ''मी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, सीएए समजून घ्या आणि नंतर इतरांनाही समजावून सांगा. नाहीतर खोटारडेपणा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे राजकीय पक्ष आपल्या व्होट बँकेच्या राजकारणासाठी आपल्याला एकमेकांविरोधात असेच लढवत राहतील.''
 

Web Title: BJP targets Rahul, says he is candidate for 2019 'lie of the year'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.