शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
2
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
3
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
4
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
5
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
6
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
7
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
8
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
9
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
10
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
11
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
12
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
13
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
14
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
15
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
16
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
17
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
18
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
19
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
20
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
Daily Top 2Weekly Top 5

“इंदिरा गांधींचा रायबरेलीतील विजय हा मतचोरीमुळेच”; निशिकांत दुबेंचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:05 IST

BJP MP Nishikant Dubey: संघ स्वयंसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.

BJP MP Nishikant Dubey: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वंदे मातरम् मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा सुरू असून, लोकसभेत मतचोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि निवडणूक प्रक्रिया यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले. 

मी प्रश्न विचारू इच्छितो, ज्यामुळे हे स्पष्ट होईल की, भाजपा भारताच्या लोकशाहीला हानी पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरत आहे. निवडणूक आयोगाचा वापर करत आहे. पहिला प्रश्न, निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढून टाकण्यात आले? ते त्या बैठकांना का नाहीत? मी तिथे होतो. हा तथाकथित लोकशाही निर्णय आहे. एका बाजूला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह. दुसरीकडे विरोधी पक्षनेते. परंतु, आम्हाला तिथे काहीच बोलता येत नाही. ते जे ठरवतात तेच घडते. पंतप्रधान आणि अमित शाह निवडणूक आयुक्तांची निवड करण्यास इतके उत्सुक का आहेत? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच मतचोरी हे सर्वांत मोठे देश विरोधी कृत्य आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेसनेच संविधान कलंकित केले

राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने भारताच्या संविधानाला कलंकित केले आहे; इंदिरा गांधी यांनीच मत चोरी करून रायबरेली येथे विजय मिळवला. संघ स्वयंसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे निशिकांत दुबे यांनी सांगितले. तसेच सन १९८७ मध्ये एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनीच देशात ईव्हीएम मशीन आणली होती, याची आठवण निशिकांत दुबे यांनी करून दिली. दुसरीकडे, भाजपाच्या संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी यांचे 'मत चोरी'चा मुद्दा आणल्याबाबत आभार मानले. राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून केलेल्या आरोपांमुळे एनडीएचा बिहार विजय झाला, असे म्हटले आहे. 

दरम्यान, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे आरएसएसचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्व संस्थांवर नियंत्रण आणू पाहत आहे. मी काहीही चुकीचे बोलत नाही. संघाने शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्या आहेत. कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेवर नव्हे तर एका संस्थेशी संलग्नतेवर आधारित करण्यात आली आहे. CBI आणि ED एकाच संस्थेशी संबंधित व्यक्तींनी ताब्यात घेतले आहेत. देशातील निवडणुका नियंत्रित करणारी तिसरी संस्था निवडणूक आयोग दुसऱ्या संस्थेद्वारे नियंत्रित केली जाते. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress tainted constitution, Indira Gandhi won by vote theft: Dubey

Web Summary : Nishikant Dubey accuses Congress of vote theft, citing Indira Gandhi's victory. Rahul Gandhi questioned election integrity, prompting rebuttals. Dubey defends RSS, while Gandhi alleges RSS control over institutions and election manipulation.
टॅग्स :ParliamentसंसदIndira Gandhiइंदिरा गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा