CoronaVirus: उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू; राम मंदिर आंदोलनात सक्रीय सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:40 AM2021-05-07T11:40:27+5:302021-05-07T11:43:14+5:30

CoronaVirus: उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आणखी एका आमदाराचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

bjp mla dal bahadur kori passed away due to coronavirus | CoronaVirus: उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू; राम मंदिर आंदोलनात सक्रीय सहभाग

CoronaVirus: उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू; राम मंदिर आंदोलनात सक्रीय सहभाग

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील भाजपच्या आणखी एका आमदाराचा कोरोनामुळे मृत्यूराम मंदिर आंदोलनात होता सक्रीय सहभागकोरोनामुळे आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांचे निधन

लखनौ: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. यातच आता उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आणखी एका आमदाराचे कोरोनामुळे निधन झाले आहे. या आमदाराचा राम मंदिर आंदोलनात सक्रीय सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. (bjp mla dal bahadur kori passed away due to coronavirus)

उत्तर प्रदेशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून, कोरोनामुळे आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील सलोन विधानसभेचे भाजप आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दल बहादूर कोरी यांना आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. लखनौच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज, शुक्रवारी सकाळी दल बहादूर कोरी प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले, अशी माहिती मिळाली आहे. 

पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

राम मंदिर आंदोलनात सक्रीय सहभाग

दिवंगत भाजप आमदार दल बहादूर कोरी यांचा राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग होता. त्यांना दोनदा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. १९९६ साली ते सलोन विधानसभेतून निवडून आले. राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना कोरी यांना मंत्रिपद मिळाले होते. २००४ मध्ये दल बहादूर कोरी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, २०१४ साली कोरी यांनी घरवापसी करत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर २०१७ साली भाजपने त्यांना सलोन विधानसभेचे तिकीट दिले आणि कोरी निवडून आले. याआधी ओरैया विधानसभेचे भाजप आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव, बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 

...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद करण्यात आली आहे.  आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
 

Web Title: bjp mla dal bahadur kori passed away due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.