गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:48 IST2025-06-21T12:48:02+5:302025-06-21T12:48:47+5:30
BJP Leader's Suspicious Death In West Bengal: पश्चिम बंगालमधील आरामबाग येथील गोघाट येथे भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत राहत्या घरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे दोन्ही हात बांधलेले असल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
पश्चिम बंगालमधील आरामबाग येथील गोघाट येथे भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत राहत्या घरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे दोन्ही हात बांधलेले असल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी त्यांची हत्या करून मृतदेह फासाला लटकवण्यात आल्याचा आरोप केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
याबाबत मिळालेल्या शनिवारी सकाळी ७ वाजता भाजपाच्या शेख बकीबुल्ला नावाच्या कार्यकर्त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. ही घटना हुगळी जिल्ह्यातील गोघाटमधील सानबंदी परिसरात घडली. मृत शेथ बकीबुल्ला हे गोघाटमधील अल्पसंख्याक मोर्चाचे मंडळ अध्यक्ष होते. आज सकाळी कुटुंबातील सदस्य उठले. तेव्हा त्यांना बकीबुल्ला यांचा मृतदेह घराच्या बाल्कनीमध्ये लटकलेल्या स्थितीत सापडला. तसेच त्यांचे दोन्ही हातही बांधलेले होते.
दरम्यान बकीबुल्ला यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच ही एक राजकीय हत्या असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोघाट पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, त्यांना स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला. पक्षाचे वरिष्ठ नेते घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. आता या प्रकरणाचा योग्य तो तपास करण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या नेत्यांसह कुटुंबीयांनी केली आहे.