लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:39 PM2021-03-31T12:39:35+5:302021-03-31T12:45:15+5:30

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. यावरून आता भाजप खासदाराने टोला लगावला आहे.

bjp leader subramanian swamy criticised pm narendra modi on pok and kashmir | लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

googlenewsNext
ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेरकाश्मीर व पाकिस्तानबाबतच्या धोरणावर नाराजीलवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील - स्वामी

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचाच भाग असून, तो पुन्हा मिळवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. जम्मू-काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. यावरून आता भाजप खासदाराने टोला लगावला असून, काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान लंडनमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेताना दिसतील, अशी टीका करण्यात आली आहे. (subramanian swamy criticised pm narendra modi)

गेल्या काही दिवसांपासून खासदार स्वामी वारंवार पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. पाकिस्तानसंदर्भात भारत सरकारच्या धोरणावरून स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. एका ट्विटर युझरने काश्मीर प्रश्नी सुब्रमण्यम स्वामींना टॅग केले. त्यावर उत्तर देताना स्वामी यांनी सदर टीका केली आहे. 

“फक्त RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत”

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी

काश्मीर प्रश्नी शरणागती पत्करली आहे. पीओके आता विसरा. मला खात्री आहे की, काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लंडनमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेताना दिसतील, अशी प्रतिक्रियेचे ट्विट स्वामी यांनी केले आहे. 

POK वर ताबा मिळवणे विसरा

एका ट्विटर युझरने एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना  POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर स्वामी यांनी दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वामी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. 

“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”

दरम्यान, आर्थिक संकटाच्या खाईत असलेला देश आणि वाढत्या महागाईचे संकट आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या उद्योगांना वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. जम्मू-काश्मीरसह दोन्ही देशांमध्ये प्रलंबित असेलल्या अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी परिणामकारक चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्मिती आवश्यक असल्याचे म्हटले होते. यावरून स्वामी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. 
 

Web Title: bjp leader subramanian swamy criticised pm narendra modi on pok and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.