"उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:38 PM2020-05-20T14:38:07+5:302020-05-20T15:27:29+5:30

भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन मत व्यक्त केलं आहे.

BJP leader Subramaniam Swamy has expressed the view that President's rule should be implemented in Maharashtra mac | "उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..."

"उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..."

Next

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मंगळवारी तब्बल २१२७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७,१३६ वर पोहचली आहे. तर १३२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहे. राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून, राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी मंगळवारी नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारला कोरोना रोखण्यास अपयश येत असल्याची टीका विरोधकंकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ महाविकास आघाडी तोडावी, नाहीतर उद्धव ठाकरेंचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून राजकारण संपवून टाकतील, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी 'महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रपती राजवट लागू करणं हेच बाकी आहे का?' या आशयाचं आर्टिकल शेअर करुन आपले मत व्यक्त केले आहे. 

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची चौथ्या टप्प्यातील अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या भाजपाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...

CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार

CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...

CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"

CoronaVirus News : ...अन् पंतप्रधान येताच डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलं असं काही; Video व्हायरल

Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत

 

Read in English

Web Title: BJP leader Subramaniam Swamy has expressed the view that President's rule should be implemented in Maharashtra mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.