Bipin Rawat Helicopter Crash: टायगर जिंदा है! सीडीएस बिपीन रावतांसाठी देशभरातून प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 05:10 PM2021-12-08T17:10:30+5:302021-12-08T17:14:09+5:30

Bipin Rawat Helicopter Crash: भारताच्या आपत्कालीन परिस्थितीत तसेच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले रावत हे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

Bipin Rawat Helicopter Crash: Tiger is alive now! Prayers across the country for CDS Bipin Rawat | Bipin Rawat Helicopter Crash: टायगर जिंदा है! सीडीएस बिपीन रावतांसाठी देशभरातून प्रार्थना

Bipin Rawat Helicopter Crash: टायगर जिंदा है! सीडीएस बिपीन रावतांसाठी देशभरातून प्रार्थना

googlenewsNext

तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नीसह 14 लष्करी अधिकारी प्रवास करत होते. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे

भारताच्या आपत्कालीन परिस्थितीत तसेच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले रावत हे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे देशभरातून रावत यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. रावत हे अतिशय आक्रमक आणि उंचीवरील लढायांसाठी निष्णात होते. 


 दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत  ( Bipin Rawat) यांनी मंगळवारी मोठा इशारा दिला होता. कोरोना महामारीचे जैविक युद्धात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असे बिपिन रावत म्हणाले होते. 

या अपघातातून रावत सुखरुप वाचावेत यासाठी पौडी गढवाल या रावत यांच्या जिल्ह्यात धारी मंदिरात पूजा अर्चा सुर झाली आहे. लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या लोकसभेत या घटनेची माहिती देणार आहेत. लष्कर प्रमुख एमएम नरवने यांनी या अपघाताबाबत घडामोडींची माहिती राजनाथ सिंहांना दिली आहे. महाराष्ट्रातील न्यू दरबार हॉलचा उद्घाटन समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार होता. तो रद्द करण्यात आला आहे. 

संबंधीत बातमी...

Bipin Rawat Helicopter Crash: एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हेलिकॉप्टर आदळत होते; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घडलेला थरार

Web Title: Bipin Rawat Helicopter Crash: Tiger is alive now! Prayers across the country for CDS Bipin Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.