मृत्यूच्या दाढेतून परत आले होते बिपीन रावत...; २०१५ मध्ये कोसळलं होतं चिता हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 05:02 PM2021-12-08T17:02:13+5:302021-12-08T17:07:00+5:30

Bipin Rawat : २०१५ मध्येही ते हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. जनरल बिपिन रावत यांचं यापूर्वीही एकदा हेलिकॉप्टर कोसळले होते. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे चिता हेलिकॉप्टर दिमापूर, नागालँड येथे क्रॅश झाले. बिपीन रावत तेव्हा लेफ्टनंट जनरल होते.

Bipin Rawat had come back from the brink of death ...; A cheetah helicopter had crashed in 2015 | मृत्यूच्या दाढेतून परत आले होते बिपीन रावत...; २०१५ मध्ये कोसळलं होतं चिता हेलिकॉप्टर

मृत्यूच्या दाढेतून परत आले होते बिपीन रावत...; २०१५ मध्ये कोसळलं होतं चिता हेलिकॉप्टर

googlenewsNext

हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नीसह लष्कराचे आणखी काही अधिकारीही होते, असे सांगण्यात आले. वृत्तानुसार, आतापर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर काही गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सीडीएस सुखरूप असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बिपिन रावत यांचा विमान अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्येही ते हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. जनरल बिपिन रावत यांचं यापूर्वीही एकदा हेलिकॉप्टर कोसळले होते. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे चिता हेलिकॉप्टर दिमापूर, नागालँड येथे क्रॅश झाले होते. बिपीन रावत तेव्हा लेफ्टनंट जनरल होते.


लेफ्टनंट जनरल बिपिन रावत दिमापूर येथील लष्कराच्या ३ कोरच्या मुख्यालयाचे नेतृत्व करत असताना फेब्रुवारी २०१५ मध्ये ही घटना घडली होती. आपल्या चिता हेलिकॉप्टरने दिमापूरहून निघाले असताना अचानक काही उंचीवर त्यांचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर कोसळले. त्यावेळी या घटनेमागचे कारण इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जनरल रावत किरकोळ जखमी झाले होते.

IAF Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर

हेलिकॉप्टर जमिनीपासून केवळ २० मीटर उंचीवर पोहोचू शकल्याचे लष्कराने नंतर उघड केले. यादरम्यान, सिंगल इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाला आणि दोन्ही वैमानिकांचे नियंत्रण सुटले. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले होते की, हवाई दलाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीही केली आहे.

Web Title: Bipin Rawat had come back from the brink of death ...; A cheetah helicopter had crashed in 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.